पतीपासून वेगळे झालेल्या सोफिया हयातचं मन झालं बावरं, पुन्हा एका नव्या बॉयफ्रेंडच्या शोधात,असा बॉयफ्रेंड हवा तिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 08:43 AM2018-05-22T08:43:24+5:302018-05-22T14:13:24+5:30

बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये वादात सापडलेली स्पर्धक सोफिया हयात कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.बोल्डनेस दाखत किंवा ...

Sophia Hyaar's heart was different from her husband, and again in search of a new boyfriend, | पतीपासून वेगळे झालेल्या सोफिया हयातचं मन झालं बावरं, पुन्हा एका नव्या बॉयफ्रेंडच्या शोधात,असा बॉयफ्रेंड हवा तिला

पतीपासून वेगळे झालेल्या सोफिया हयातचं मन झालं बावरं, पुन्हा एका नव्या बॉयफ्रेंडच्या शोधात,असा बॉयफ्रेंड हवा तिला

googlenewsNext
ग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये वादात सापडलेली स्पर्धक सोफिया हयात कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.बोल्डनेस दाखत किंवा वादग्रस्त विधानं करत तसंच दररोज काही ना काही कारनामे करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा सोफिया प्रयत्न करत असते. कधी काळी तर तिने चक्क नन बनत सांसारिक सुखाचा त्याग करत अध्यात्मकडे वळल्याचेही नाटक केले.आता पुन्हा एकदा ही सोफिया चर्चेत आली आहे.पती ब्लादसह बिघडलेल्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली आहे. पतीपासून वेगळे होत असल्याचं तिने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. पतीने फसवल्याचा आरोप करत तिने त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. पतीने साखरपुड्याची अंगठी आणि महागडं घड्याळ विकल्याचा धक्कादायक आरोपसुद्धा सोफियाने केला होता. त्याआधी तिने आपण प्रेग्नेन्ट असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर गर्भपाताबाबत दुःख व्यक्त करत एक फोटो शेअर करुन शरीर पूर्वीसारखे राहिले नसल्याचे सांगितले होते. बाळाची चाहुल लागल्यापासून आणि ते गमावल्यानंतर आता शरीराचा शेप बिघडल्याचे तिने म्हटले होते. आता मात्र सोफिया नव्या प्रेमाच्या शोधात आहे. पती ब्लादला विसरल्याचे तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. लग्न संस्थेवर विश्वास राहिला नसून एखादा चांगला बॉयफ्रेंड मिळाला तर त्याचा नक्की विचार करेन असं सोफियाने म्हटले आहे. कुणी आवडलाच तर त्याला आधी पूर्णपणे जाणून घेईल आणि जो आपल्या दर्जाचा असेल अशाच व्यक्तीशी नातं जोडेल असं सोफियाने नमूद केले आहे. शिवाय हा बॉयफ्रेंड ईर्ष्या बाळगणारा असू नये अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे.सोफियाने नवऱ्यासोबतचे सगळे संबंध संपुष्टात आणल्याचे एप्रिल महिन्यात इंस्टाग्राम अकाउंटवरुन जाहिर केले होते.

Web Title: Sophia Hyaar's heart was different from her husband, and again in search of a new boyfriend,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.