मेहंदी सेरेमनीवेळी भावूक झाली सौंदर्या रजनीकांत, पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 01:51 PM2019-02-10T13:51:23+5:302019-02-10T13:52:25+5:30
साऊथ मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत उद्या ११ फेब्रुवारीला उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. तूर्तास सौंदर्याच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर धूम करताहेत.
साऊथ मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत उद्या ११ फेब्रुवारीला उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे सौंदर्याचे दुसरे लग्न आहे. या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. तूर्तास सौंदर्याच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर धूम करताहेत.
या फोटोत सौंदर्या तिचे पापा रजनीकांत, मुलगा वेद (पहिल्या पतीपासून झालेला) आणि भावी पती विशगनसोबत दिसतेय. ‘माझ्या आयुष्यातील तीन सर्वाधिक महत्त्वाचे पुरूष, माझे लाडके बाबा, माझा राजकुमार पुत्र वेद आणि आता माझा विशगन...,’ असे सौंदर्याने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.
Blessed & grateful beyond words !!!! The three most important men in my life ... my darling father ... my angel son ... and now you my Vishagan ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/v7Ra32oiYe
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) February 10, 2019
सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. सौंदर्याप्रमाणेच तिचा होणारा पती विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाहीत.
कनिकाने निर्माता वरूण मनियनसोबत दुसरे लग्न केले आणि विशगनही सौंदयार्सोबत लग्न करण्यास सज्ज आहे. विशगन हा एका औषध कंपनीचा मालक आहे. याशिवाय अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. वंजगर उलगम या तामिळ चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता. २०१० मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत लग्न केले होते.
सप्टेंबर २०१० रोजी सौंदर्या व अश्विन दोघेंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१६ मध्ये सौंदर्या व अश्विन त्यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले होते. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी माझ्या पतीपासून विभक्त झालेय, असे यानंतर सौंदयार्ने टिष्ट्वटरवरून जाहिर केले होते.