अन् या अभिनेत्याने शूटींगच्या शेवटच्या दिवशी भेट दिल्या 400 सोन्याच्या अंगठ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 01:37 PM2019-08-14T13:37:29+5:302019-08-14T14:46:03+5:30

त्याने प्रत्येकाला एक सोन्याची अंगठी भेट दिली. या अंगठीवर इंग्रजीत सिनेमाचे नाव कोरलेले आहे.

south actor vijay gives crew of film bigil gold rings as a gift |  अन् या अभिनेत्याने शूटींगच्या शेवटच्या दिवशी भेट दिल्या 400 सोन्याच्या अंगठ्या

 अन् या अभिनेत्याने शूटींगच्या शेवटच्या दिवशी भेट दिल्या 400 सोन्याच्या अंगठ्या

googlenewsNext
ठळक मुद्देविजयचा ‘बिगिल’ हा सिनेमा यावर्षी आक्टोबरमध्ये प्रदर्शित होतोय.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखर याच्यावर ‘बिगिल’ या तामिळ स्पोर्ट अ‍ॅक्शन सिनेमाचे क्रू मेंबर्स सध्या जाम खूश आहे. याचे कारणही खास आहे.  कारण आहे सोन्याच्या अंगठ्या. होय, विजयच्या ‘बिगिल’ या सिनेमाचे शूटींग नुकतेच संपले. शूटींगच्या शेवटच्या दिवशी विजयने ‘बिगिल’च्या सेटवर काम करणा-या 400 क्रू मेंबर्सला एक सुखद धक्का दिला. त्याने प्रत्येकाला एक सोन्याची अंगठी भेट दिली.  या अंगठीवर इंग्रजीत ‘बिगिल’ या सिनेमाचे नाव कोरलेले आहे.

विजयकडून मिळालेल्या या अनोख्या गिफ्टमुळे सगळ्यांनाच आनंद झाला. मग काय, टीममधील प्रत्येकाने या गिफ्टचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा सुरु केला. सोबत विजयचे आभारही मानलेत. सिनेमासाठी झटणा-या प्रत्येकाचा कामाचे कौतुक करणारा विजय खरोखरच खास आहे. यासाठी मोठ मन असावं लागतं, असे एकाने या अंगठीचा फोटो शेअर करताना लिहिले.


 

यापूर्वी विजयने या सिनेमाच्या एका दृष्यासाठी फुलबॉलपटू म्हणून सेटवर आलेल्यांना फुटबॉल सही करुन भेट म्हणून दिले होते.
विजयचा ‘बिगिल’ हा सिनेमा यावर्षी आक्टोबरमध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटातील ए. आर. रहमान यांनी गायलेले गाणे सध्या तुफान लोकप्रिय झाले आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट विजयच्या करिअरमधील सगळ्यात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट 140 कोटी रूपये असल्याचे कळतेय. यात विजय एका फुटबॉलपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 

Web Title: south actor vijay gives crew of film bigil gold rings as a gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.