'कंगनाला राणौतला पद्मश्री आणि आम्हाला काय?'; दाक्षिणात्य अभिनेत्रीची सरकारवरही टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:15 IST2022-12-26T08:56:34+5:302022-12-26T13:15:26+5:30
कंगना राणौतला पद्मश्री दिल्यावरुन दाक्षिणात्य अभिनेत्री जयासुधा यांनी एक विधान केले आहे.

'कंगनाला राणौतला पद्मश्री आणि आम्हाला काय?'; दाक्षिणात्य अभिनेत्रीची सरकारवरही टीका
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतवर आता बॉलिवुडच नाही तर दाक्षिणात्य इंडस्ट्री देखील टीका करत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्रीने कंगनावर निशाणा साधला आहे. कंगना राणावतला पद्मश्री दिल्यावरुन दाक्षिणात्य अभिनेत्री जयसुधा यांनी एक विधान केले आहे.
सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांच्या ‘अनस्टॉपेबल विथ एनबीके’ (Unstoppable With NBK) या शोमध्ये अभिनेत्री जयासुधा (Jayasudha) यांनी हे वक्तव्य केले आहे. दक्षिण भारतीय सिनेमाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली आहे. 'कंगना राणौतला पद्मश्री प्रदान करण्यात आला. ती एक चांगली अभिनेत्री आहे. पण फक्त १० चित्रपटांमध्ये काम करून हा पुरस्कार देण्यात आला आणि आम्ही अनेक चित्रपटांमध्ये काम करुनही सरकारने आमची दखलही घेतलेली नाही.' या कार्यक्रमात जया प्रदा आणि राशी खन्ना पाहुण्या होत्या.
अभिनेत्री जयासुधा यांनी सूर्यवंशम या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यात त्यांनी अमिताभ यांच्या पत्नीची भुमिका साकारली होती. जयासुधा यांनी 'पंदन्ति कापूरम' या तेलगू सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
दुसरीकडे कंगना लवकरच 'इमर्जन्सी' सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भुमिका साकारत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी यांचीही भुमिका आहे.