Pooja Hegde : वाह ! दाक्षिणात्य अभिनेत्री जेव्हा 'मराठी भक्तीगीत' गाते..पूजा हेगडेने जिंकले चाहत्यांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:53 AM2022-12-16T11:53:22+5:302022-12-16T11:55:47+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे हिने सध्या एका कृतीने मराठी लोकांचे मन जिंकले आहे.

south-actress-pooja-hegde-shocks-everyone-when-she-sung-dehachi-tijori-marathi-song-in-proper-way | Pooja Hegde : वाह ! दाक्षिणात्य अभिनेत्री जेव्हा 'मराठी भक्तीगीत' गाते..पूजा हेगडेने जिंकले चाहत्यांचे मन

Pooja Hegde : वाह ! दाक्षिणात्य अभिनेत्री जेव्हा 'मराठी भक्तीगीत' गाते..पूजा हेगडेने जिंकले चाहत्यांचे मन

googlenewsNext

Pooja Hegde :  दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे हिने सध्या एका कृतीने मराठी लोकांचे मन जिंकले आहे. मराठीतील लोकप्रिय भक्तीगीत 'देहाची तिजोरी' हे प्रत्येकाच्या घरात म्हणलं जातं. लहानपणी प्रत्येकानेच हे गीत ऐकलेलं आहे जे आजही आपल्याला पाठ आहे. पण एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने देहाची तिजोरी गायलं तर आश्चर्याचा धक्काच बसेल.

रोहित शेट्टीच्या 'सर्कस' सिनेमाची टीम 'चला हवा येऊ द्या' शो मध्ये प्रमोशनसाठी आली होती. नेहमीप्रमाणेच कार्यक्रमात धमाल आली. मात्र सर्कस सिनेमाची मुख्य अभिनेत्री पूजा हेगडेने देहाची तिजोरी हे भक्तीगीत गायलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्वप्नील जोशी, निलेश साबळे, सिद्धार्थ जाधव आणि रोहित शेट्टी यांनी पूजा ला दाद दिली. 

रोहीत शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये पुजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर यांचीही भुमिका आहे. तर दीपिका पदुकोणचा यात कॅमिओ असणार आहे.

 

Web Title: south-actress-pooja-hegde-shocks-everyone-when-she-sung-dehachi-tijori-marathi-song-in-proper-way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.