साऊथची 'ही' अभिनेत्री मेकअपच करत नाही, काय आहे कारण? हिट सिनेमे देऊनही राहते साधीच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 02:43 PM2023-04-02T14:43:23+5:302023-04-02T14:44:22+5:30

सध्या खूप कमी अभिनेत्री असतील ज्या मेकअप न करता समोर येतात. पण साऊथची एक अभिनेत्री चित्रपटातही मेकअप करत नाही.

south actress sai pallavi never does makeup live her life simply | साऊथची 'ही' अभिनेत्री मेकअपच करत नाही, काय आहे कारण? हिट सिनेमे देऊनही राहते साधीच

साऊथची 'ही' अभिनेत्री मेकअपच करत नाही, काय आहे कारण? हिट सिनेमे देऊनही राहते साधीच

googlenewsNext

सध्या खूप कमी अभिनेत्री असतील ज्या मेकअप न करता समोर येतात. प्रत्येक अभिनेत्रीचं खरं रुप आपल्याला माहितच नसतं. मग एखादा त्यांचा नो मेकअप लुक फोटो आलाच तर ओळखूही येत नाही ही तीच अभिनेत्री आहे. मात्र या सगळ्याला साऊथची अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) अपवाद आहे.

'गार्गी' फेम अभिनेत्री साई पल्लवी कायमच तिच्या साधेपणाने सर्वांना आकर्षित करते. ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जे मेकअपशिवाय कॅमोऱ्यासमोर येणं पसंत करतात. तिने मल्याळम फिल्म 'प्रेमम' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासूनच तिने कधीच सिनेमात मेकअप केलेला नाही.

एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत साई पल्लवी सांगते,'मला वाटतं मेकअपमुळे दबाव जाणवतो. कायम परफेक्ट दिसण्याचा तो दबाव असतो. म्हणून मला बिना मेकअपचं राहायला आवडतं. पण हे माझं मत आहे इतरांना मेकअप आवडूही शकतो त्यात काहीच चुकीचं नाही.'

ती पुढे म्हणाली, 'सिनेमा नक्की कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी मला स्वत:च निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबर चर्चा करायला आवडतं. मला कोणा मध्यस्थीची गरज पडत नाही. लहानपणापासूनच मला नृत्याने शिस्त लावली. नृत्य शरिरात लय निर्माण करतं. तीन वर्ष मी फक्त डोला रे डोला वर डान्स केला. मी फिल्मस्टार नाहीए. मी फक्त नशीबवान आहे की मला जे आवडतं ते मी करु शकते. 

साई पल्लवी चा 'गार्गी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामधील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं गेलं. तसंच तिला तेलुगू मध्ये 'विराट पर्वम' आणि 'श्याम सिंहा रॉय' मध्ये पाहिलं गेलं.

Web Title: south actress sai pallavi never does makeup live her life simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.