एका व्हायरल Video नंतर 'या' अभिनेत्रीने शॉर्ट कपडे घालणंच सोडलं, 'मेकअपही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 16:27 IST2023-07-09T16:27:13+5:302023-07-09T16:27:58+5:30
अभिनेत्री म्हणलं की ती मेकअप करत असणार, छोटे कपडे घालत असणार असाच अनेकांचा समज होतो.

एका व्हायरल Video नंतर 'या' अभिनेत्रीने शॉर्ट कपडे घालणंच सोडलं, 'मेकअपही...'
अभिनेत्री म्हणलं की ती मेकअप करत असणार, स्टायलिश किंवा छोटे कपडे घालत असणार असाच अनेकांचा समज होतो. ते खरंही आहे. आजकाल बाहेरील सुंदरतेकडे जास्त बघितलं जातं. पडद्यावर चांगलं दिसण्यासाठी हे करावंच लागतं. पण एक अभिनेत्री या सर्व गोष्टींना अपवाद ठरते. ना ती सिनेमात मेकअप करते ना ती शॉर्ट ड्रेस घालून मिरवते. कोण आहे अशी अभिनेत्री?
फिल्म इंडस्ट्रीत काम करताना अनेक कलाकार आपल्या अटीशर्तींसबह काम करतात. किसींग सीन देणार नाही, अशाप्रकारचे कपडे घालणार नाही असे नियम त्यांनी स्वत:लाच घातलेले असतात. पण साऊथमध्ये अशी अभिनेत्री आहे जिने आयु्ष्यात कधीच तोकडे कपडे घालणार नसल्याची शपथ घेतली. ती अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी (Sai Pallavi). होय, साई पल्लवी आपल्या सरळ साध्या वागणुकीमुळे ओळखली जाते. पण तिने असा निर्णय घ्यायचं कारण काय? तिच्यासोबत एक अशी घटना घडली होती ज्यामुळे तिने हा निर्णय घेतला.
मनोरंजनक्षेत्रात आल्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं की मी नंतर तो निर्णय घेतला. साई पल्लवी जॉर्जिया येथे शिकली आहे. तिने तिथे टँगो डान्सचं शिक्षण घेतलं. या डान्स प्रकारात छोटे कपडे घालावे लागतात. साई पल्लवीचा प्रेमम सिनेमा रिलीज झाल्यानंतर तिचा टँगो डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओतील तिचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी अतिशय घाणेरड्या शब्दात कमेंट्स केल्या. ते वाचून साई पल्लवीला त्रास झाला आणि तिने यापुढे कधीच छोटे कपडे घालणार नाही असं ठरवलं.
साई पल्लवीला साधं राहणीमानच जास्त आवडतं. म्हणूनच ती अनेक सिनेमांमध्ये मेकअपही करत नाही. चाहते तिच्या याच साधेपणाची स्तुती करतात. साई पल्लवी आगामी 'SK 21' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिची शिव कार्तिकेयन सोबत जोडी जमली आहे.