'अॅनिमल पार्क'मध्ये रणबीरसोबत रोमांस करणार ही साऊथची अभिनेत्री, तृप्ती डिमरीपेक्षा दिसते हॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 14:24 IST2023-12-18T14:22:56+5:302023-12-18T14:24:32+5:30
Animal Park Movie : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर 'अॅनिमल' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने १४ दिवसांत ७८४ कोटींचा आकडा पार केला आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलचीही चर्चा आहे. या चित्रपटात रणबीरसोबत दिसणार्या अभिनेत्रीचे नावही समोर आले आहे.

'अॅनिमल पार्क'मध्ये रणबीरसोबत रोमांस करणार ही साऊथची अभिनेत्री, तृप्ती डिमरीपेक्षा दिसते हॉट
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'अॅनिमल' (Animal Movie) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने १४ दिवसांत ७८४ कोटींचा आकडा पार केला आहे. 'अर्जुन रेड्डी'च्या दिग्दर्शकाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर षटकार मारला आहे. तसेच या चित्रपटातील रणबीरचा लूक आणि बॉबी देओलच्या गाण्याचीही जास्त चर्चा आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलचीही चर्चा आहे. या चित्रपटात रणबीरसोबत दिसणार्या अभिनेत्रीचे नावही समोर येऊ लागले असल्याची बातमी आहे.
सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, एक प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री त्याच्या 'अॅनिमल पार्क' या चित्रपटात रणबीरसोबत दिसणार आहे. लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री मालविका मोहनन 'अॅनिमल' म्हणजेच 'अॅनिमल पार्क'च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की ती तृप्ती डिमरीसारख्या शत्रू टीमचा भाग असू शकते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक रमेश बाला यांच्या ट्विटवरून हा खुलासा झाला आहे. त्यांनी X वर पोस्ट केले की मालविका मोहनन रणबीर कपूरच्या 'अॅनिमल २'मध्ये रणबीर कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसू शकते. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, ही जोडी याआधी कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसली नाही. त्यामुळे त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.
'अॅनिमल'बद्दल
'अॅनिमल' चित्रपटाबद्दल सांगायचे तर रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, प्रेम चोप्रा, रश्मिका मंदान्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी यांनी बनवला आहे ज्यांनी 'कबीर सिंग' बनवला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.