Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल त्याचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:01 IST2022-11-17T14:59:59+5:302022-11-17T15:01:57+5:30
सध्या एका वेगळ्याच कारणानं विजय देवरकोंडाची चर्चा होतेय. होय, विजय देवराकोंडा आणि त्याच्या आईने एक मोठा निर्णय घेतला आहे...

Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल त्याचं कौतुक
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही (Vijay Deverakonda) कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान. कधीकाळी याच विजय देवरकोंडाकडे घराचे भाडे द्यायला पैसे नव्हते. आज तो कोट्यवधींचा मालक आहे. हैदराबादेत त्याचा अलिशान घर आहे. अलीकडे 20 कोटी रूपयांत त्याने हे डुप्लेक्स घर खरेदी केले होते. या घरात विजय आई-बाबा व भावासोबत राहतो. सध्या मात्र एका वेगळ्याच कारणानं विजय देवरकोंडाची चर्चा होतेय.
Vijay Deverakonda | Encouraging Organ Donation at Adult and Pediatric Liver Transplantation Awareness Program, PACE Hospitals #VijayDeverakonda#livertransplant#pacehospitalspic.twitter.com/iIUneNPb6w
— PACE Hospitals (@PACEHospitals) November 16, 2022
होय, नुकतंच विजयने पेस रुग्णालयाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने अवयव दानाबद्दल माहिती दिली.
तो म्हणाला, ‘अनेक शस्त्रक्रिया केवळ अवयवदान करणार्यांमुळे होतात. इतक्या मोठ्या संख्येत लोक अवयवदान करत आहेत, यावर विश्वास करणं कठीण आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. दक्षिण आशियायी देशांत अवयवदानाचं प्रमाण कमी आहे, अशी माहितीही मला मिळाली आहे. मी माझे अवयव दान करू इच्छितो. स्वत:चे अवयव वाया घालवणं मला निरर्थक वाटतं. मी तंदुरुस्त राहतो आणि स्वत:ला निरोगी ठेवतो. माझ्यानंतर माझे अवयव उत्तम स्थितीत असल्यास त्यांचा उपयोग व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी आणि माझ्या आईने अवयवदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. तुमच्या या उदारपणामुळे कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्ही जिवंत राहता. अवयवदानाबद्दल विचार करा, मी सगळ्यांनाच हे सांगू इच्छितो.’
विजय देवरकोंडाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. त्याच्या चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे.
अलीकडे विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाकडून सर्वांनाच प्रचंड अपेक्षा होत्या. पण सिनेमा सुपरडुपर फ्लॉप गेला. यामुळे विजयला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. विजय देवरकोंडा लवकरच सामंथा रुथ प्रभूसह ‘खुशी’ या चित्रपटात दिसणार आहे. येत्या 23 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.