फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर करतेय राज्य,ओळखा पाहू कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:00 AM2022-02-05T07:00:00+5:302022-02-05T14:03:15+5:30

South Popular Actress Childhood Photo: ही चिमुकली आज एक-दोन नव्हे तर 5 आलिशान बंगल्याची मालकीण आहे.

South top actress childhood photo creating buzz on social media | फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर करतेय राज्य,ओळखा पाहू कोण आहे ती?

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर करतेय राज्य,ओळखा पाहू कोण आहे ती?

googlenewsNext

South Popular Actress Childhood Photo: चेहऱ्यावर हात ठेवून पोज देणारी ही मुलगी आजच्या तारखेतील दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ए आज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे. नुकताच तिचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आजकाल त्यांच्या चित्रपटातील गाणं (South Movie Song) सर्वांच्याच ओठावर आहे. नुकताच या निरागस दिसणाऱ्या चिमुकलीने गोव्या(Goa) त एक आलिशान बंगलाही खरेदी केला आहे.

या अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला ओळखले असेलच. इतक्या हिंटनंतरही तुम्ही तिला ओळखले नसले तर  आम्ही तुम्हाला सांगतो. ही मुलगी दुसरी कोणी नसून नॅशनल क्रश आणि पुष्पा स्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)आहे.

रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात रश्मिका श्रीवल्ली (Srivalli)च्या भूमिकेत दिसली होती. रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) ने आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाने एक-दोन नव्हे तर 5 आलिशान बंगल्याची मालकीण आहे. 2016 मध्ये रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna Debut) ने कन्नड चित्रपटात पदार्पण केले.  आज ती कुठेही गेली तरी तिची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात. इतकेच नाही तर लवकरच रश्मिका (Rashmika Mandanna Bollywood Debut)  देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. गुडबाय या चित्रपटात ती अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांच्या सोबत दिसणार आहे.

Web Title: South top actress childhood photo creating buzz on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.