South vs Bollywood : बाप बाप होता है..., सुनील शेट्टीचा महेश बाबूला जोरदार टोला, मुकेश भट काय म्हणाले वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:26 AM2022-05-12T10:26:37+5:302022-05-12T10:29:47+5:30

South vs Bollywood : साऊथ विरूद्ध बॉलिवूड असं शीतयुद्ध सुरू झालं आहे. महेश बाबूच्या वक्तव्यानंतर आता या वादात बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी व बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते मुकेश भट यांनी उडी घेतली आहे

south vs bollywood sunil shetty mukesh bhatt reply to mahesh babu | South vs Bollywood : बाप बाप होता है..., सुनील शेट्टीचा महेश बाबूला जोरदार टोला, मुकेश भट काय म्हणाले वाचा

South vs Bollywood : बाप बाप होता है..., सुनील शेट्टीचा महेश बाबूला जोरदार टोला, मुकेश भट काय म्हणाले वाचा

googlenewsNext

South vs Bollywood  : साऊथ विरूद्ध बॉलिवूड असं शीतयुद्ध सुरू झालं आहे आणि दोन्ही इंडस्ट्रीतले स्टार्स या वादात उतरले आहेत. अलीकडे साऊथ सुपरस्टार महेश बाबूनं ( Mahesh Babu) यानं बॉलिवूडबद्दल एक मोठं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं म्हणत त्यानं सगळ्यांना हैराण केलं. महेश बाबूच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असताना आता या वादात बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) व बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते मुकेश भट (Mukesh Bhatt) यांनी उडी घेतली आहे. सुनील शेट्टीनं महेश बाबूला जोरदार टोला लगावला आहे तर मुकेश भट यांनी एकप्रकारे महेश बाबूचं समर्थन केलं आहे. (Sunil Shetty reaction on Mahesh Babu comment on bollywood:)

बाप बाप होता है...

सुनील शेट्टी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत या वादावर बोलला. मी सुद्धा साऊथचाच आहे. पण मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मला मुंबईकर म्हणूनच लोक ओळखतात. माझ्या मते, साऊथ वर्सेज बॉलिवूड हा सीन सोशल मीडियानं बनवला आहे. सगळेच भारतीय आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाषा नाही तर कंटेन्ट महत्त्वाचा ठरतो. पण अंतिम सत्य प्रेक्षक हेच आहे. काय पाहायचं आहे आणि काय नाही, हे ठरवणारा शेवटी प्रेक्षक आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे, आपण याच प्रेक्षकांना विसरतो आहोत. आपल्याला कंटेन्टवर काम करायला पाहिजे. एक गोष्ट मात्र तेवढीच खरी की ओटीटी असो वा सिनेमा बाप हमेशा बाप ही रहेगा. बॉलिवूड नेहमी बॉलिवूड राहिल. जोपर्यंत भारत ओळखला जाईल, तोपर्यंत बॉलिवूड हिरोही ओळखले जातील, असं सुनील शेट्टी म्हणाला.

महेश बाबूचं काय चुकलं?

मुकेश भट यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड वर्सेज साऊथ वादावर प्रतिक्रिया दिली. ‘महेश बाबू जे काही बोलला त्यात मला काहीही चुकीचं वाटलं नाही. बॉलिवूड त्याला त्याची योग्य किंमत देऊ शकत नसेल तर ठीक आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्याकडे टॅलेंट आहे आणि याच टॅलेंटची किंमत आहे. जी त्याने वर्षानुवर्ष काम करून कमावली आहे. बॉलिवूड त्याच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही, असं त्याला वाटत असेल तर त्यात काहीही गैर नाही. एखाद्याच्या प्राईज टॅगवरून नाराज होण्याचं कारण नाही. बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नाही, असं महेश बाबू का म्हणाला, याचं खरं कारण मला माहित नाही. पण अभिनेता या नात्यानं ही त्याची निवड आहे,’असं मत मुकेश भट यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाला महेशबाबू...
बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचा विचार आहे का? असा सवाल महेश बाबूला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आला. यावर महेशबाबूनं दिलेलं उत्तर ऐकून सगळेच हैराण झालेत. ‘बॉलिवूडमधून मला अनेक ऑफर्स मिळतात. पण मला वाटतं,बॉलिवूड मला अफोर्ड करू शकणार नाही. त्यांना मी परवडणार नाही. त्यामुळे मी तिथे जाऊन माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही,’असं महेश बाबू म्हणाला. ‘मला साऊथच्या सिनेमांनी जेवढं काही स्टारडम, यश, प्रेम दिलं आहे, ते भरपूर आहे. मला आणखी स्टारडम नकोय. माझी इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याची माझा विचार नाही. मी नेहमी मोठं व्हायचं आणि भरपूर सिनेमा बनवायचं स्वप्न पाहिलं होतं. माझं स्वप्न आता खरं होत आहे. मी इथेच खूश आहे. मला नेहमीच तेलगू चित्रपटात काम करायचं होतं. भारतातील सर्व लोकांनी ते पाहावेत अशी इच्छा होती.आता असं होतांना दिसतंय आणि याचा मला आनंद आहे. माझी ताकद तेलगू सिनेमे आहेत,’असंही तो म्हणाला.

Web Title: south vs bollywood sunil shetty mukesh bhatt reply to mahesh babu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.