दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 18:26 IST2020-12-23T18:25:35+5:302020-12-23T18:26:21+5:30
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, जाणून घ्या याबद्दल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका, सिद्धार्थ मल्होत्रासह 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक नुकताच समोर आला असून ज्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पहायला मिळतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहे.
'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन 'मिशन मजनू' हा चित्रपट तयार करणार आहे.
या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे.
याबद्दल अभिनेत्री रश्मिका मंदाना सांगते की, 'मला विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे, याचा मला खूप आनंद आहे. पुढे म्हणाली की, या चित्रपटाची कथा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे की, त्यांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली.
या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत माझा प्रवास सुरू झाल्याने आणि नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप उत्साही आहे.