Video: १४ वर्षांनी बॉलिवूड कमबॅक करताना फरदीनचा कंठ दाटून आला! म्हणाला, "खुप मोठा कालावधी.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:47 IST2024-04-10T13:41:29+5:302024-04-10T13:47:29+5:30
बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने १४ वर्षांनी करत असलेल्या कमबॅकवर भावूक प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला फरदीन बघा

Video: १४ वर्षांनी बॉलिवूड कमबॅक करताना फरदीनचा कंठ दाटून आला! म्हणाला, "खुप मोठा कालावधी.."
बॉलिवूड लोकप्रिय अभिनेता फरदीन खान हा संजय लीला भन्सालींच्या 'हिरामंडी' वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. फरदीन 'हिरामंडी' वेबसिरीजच्या माध्यमातून १४ वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे. 'हिरामंडी' वेबसिरीजमध्ये फरदीन अनेक वर्षांनी चांगल्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'हिरामंडी'च्या ट्रेलर लॉंचवेळी इतक्या वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करण्यावर बोलताना फरदीन खान भावूक झालेला दिसला.
फरदीन खान म्हणाला, "सुरुवातीला सांगायचं तर माझ्यासाठी हा खुप मोठा काळ होता. पुन्हा एकदा अभिनय करायला मला तब्बल १४ वर्ष लागली. मला या वेबसिरीजमधील तगड्या स्टारकास्टसोबत काम करायला मिळालं ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. नेटफ्लिक्स आणि संजय लीला भन्साली यांच्याहून मोठी कमबॅकची संधी मला मिळू शकत नाही."
मी जी भूमिका केलीय तशी भूमिका मी आजवर कधी केली नाही. माझं सध्याचं वय पाहता मोठ्या पडद्यावरही मला तशीच भूमिका साकारायला मिळत आहे. ही भूमिका साकारताना मला वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या अनुभवाचा वापर करता आला. मी आता हे बोलताना खुप इमोशनल होत आहे. संजय लीला भन्साली आणि सर्वांचाच मी आभारी आहे." अशा शब्दात फरदीनने आपल्या भावना व्यक्त केल्या.