मुंबईवरुन सलमनाला जोधपूरला भेटायला जाणार 'ही' खास व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 08:04 AM2018-04-06T08:04:23+5:302018-04-06T13:34:23+5:30

सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. कारण  गुरुवारपासून काळविट शिकार प्रकरणी सलमान खानला तुरुंगात जावं लागले आहे. ...

Special person to go to Mumbai to meet Zodafar | मुंबईवरुन सलमनाला जोधपूरला भेटायला जाणार 'ही' खास व्यक्ती

मुंबईवरुन सलमनाला जोधपूरला भेटायला जाणार 'ही' खास व्यक्ती

googlenewsNext
मान खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. कारण  गुरुवारपासून काळविट शिकार प्रकरणी सलमान खानला तुरुंगात जावं लागले आहे. सलमान तुरुंगात असल्याने त्याचे खास मित्र ही उदास झाले आहेत. सलमान आणि साजिद नाडियाडवाला यांची मैत्री संपूर्ण इंडस्ट्रिला माहिती आहे. साजिदने गुरुवारी उठवलेली 'बागी2'ची सक्सेस पार्टी रद्द करण्यात आली आणि आज तो सलमानला भेटायला जोधपुरला जाणार आहे.   

साजिदचा चित्रपट 'बागी2' 100 कोटींच्या कल्बमध्ये सहभागी झाला आहे. याचे सेलिब्रेशन करण्याकरिता ही पार्टी ठेवण्यात आली होती. मात्र  गुरुवारी सलमानला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ती रदद् करण्यात आली. 

गुरुवारी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने काळविट शिकार प्रकरणी सलमानला  पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दांडाची शिक्षा सुनावली. कालची रात्र सलमानने तुरुंगातच काढली आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र  आज तरी त्याला कुठलाही दिलासा मिळू शकला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमानच्या जामिनावरील निर्णय उद्या शनिवारीपर्यंत राखून ठेवला. यासोबतच सलमानला शिक्षेची दुसरी रात्रही तुरूंगातचं काढावी लागणार, हे स्पष्ट झाले.

१९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने काल गुरूवारी सलमानला दोषी ठरवत, पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यानंतर जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात सलमानची रवानगी करण्यात आली होती. कालची अख्खी रात्र सलमानने तुरुंगात काढली. ‘हम साथ साथ है’च्या शूटींगदरम्यान सलमान खान आणि इतर आरोपी घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. यादरम्यान भवाद गावात २७व२८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे.  यानंतर १ आॅक्टोबर रोजी कांकणी गावात काळवीटांची शिकार केल्याचाही आरोप आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमानविरोधात एकूण चार गुन्हे (कांकाणी प्रकरण, घोडा फार्म हाऊस प्रकरण, भवाद प्रकरण, आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरण)दाखल झाले होते. यापैकी तीन खटले काळवीट शिकारीचे होते तर चौथा आर्म्स अ‍ॅक्टचा होता. काल सलमानला शिक्षा ठोठावण्यात आली,ते प्रकरण कांकाणी गावातील आहे.

Web Title: Special person to go to Mumbai to meet Zodafar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.