हर्षवर्धनला शुभेच्छा देण्यासाठी अवतरली स्पेशल व्यक्ती !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2016 06:34 AM2016-09-14T06:34:52+5:302016-09-14T12:13:05+5:30

सुवर्णा जैन,मुंबई कोणत्याही कलाकारासाठी त्याचा पहिला सिनेमा हा विशेष असतो. त्यात एखादा स्टार पुत्र किंवा कन्या असेल तर त्यावर ...

Special person who came to greet Harsh Vardhan! | हर्षवर्धनला शुभेच्छा देण्यासाठी अवतरली स्पेशल व्यक्ती !

हर्षवर्धनला शुभेच्छा देण्यासाठी अवतरली स्पेशल व्यक्ती !

googlenewsNext
वर्णा जैन,मुंबई



कोणत्याही कलाकारासाठी त्याचा पहिला सिनेमा हा विशेष असतो. त्यात एखादा स्टार पुत्र किंवा कन्या असेल तर त्यावर जगाच्या नजरा असतात.
असंच काहीसं दृष्य पाहायला मिळालं मिर्झिया सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला. यावेळी अभिनेता हर्षवर्धन कपूरसाठी सा-या कपूर कुटुंबीयांनी फॅमिली पॉवर दाखवली. यावेळी सारं कपूर कुटुंबीय हर्षवर्धनच्या नव्या इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी हजर होतं. यात पापा अनिल कपूर, आई सुनिता कपूर, बहिण सोनम आणि रिया तसंच काका बोनी कपूर, संजय कपूर, श्रीदेवी, महीप कपूर, मोहित मारवाह सारेच उपस्थित होते.



मात्र सगळ्यांमध्ये सा-यांचं लक्ष वेधून घेतलं एका खास व्यक्तीने. ही खास व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन कपूरची आजी निर्मला कपूर. आपल्या लाडक्या नातवाच्या नव्या इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी निर्मला कपूर व्हिलचेअरवरुन या सोहळ्यात उपस्थित होत्या. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी मिर्झिया या सिनेमातून हर्षवर्धन रुपेरी पडद्यावर एंट्री मारतोय. 7 ऑक्टोबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.



सिनेमाच माझं भविष्य ठरवतील - हर्षवर्धन
 
अभिनेता अनिल कपूर आणि त्यांची लेक सोनम कपूर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. गेल्या अनेक दशकांपासून अनिल कपूर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून आजही त्यांची जादू कायम आहे. सोनमनंही तिच्या अभिनयानं जम बसवण्यास सुरुवात केलीय. आता कपूर खानदानातील आणखी एकजण आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झालाय. अनिल कपूर यांचा लेक हर्षवर्धन कपूर मिर्झिया या सिनेमातून बॉलिवुडमध्ये एंट्री मारतोय. मात्र पापा अनिल कपूर आणि बहिण सोनम कपूर यांचा वारसा समर्थपणे चालवण्याचा दबाव त्याच्यावर आहे. अनिल कपूर यांच्याप्रमाणेच हर्षवर्धननंही करियरमध्ये नवी उंची गाठावी अशा फॅन्सच्या अपेक्षा आहेत. मात्र आपल्यावर कोणत्याही गोष्टीचं दडपण नसल्याचं हर्षवर्धननं म्हटलंय. आपल्याला करियरमध्ये विविध विषय असलेले सिनेमा करायचे असून त्यातून मला माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे असं हर्षवर्धननं म्हटलंय.



छे दडपण... ते काय असतं ?
 
हिंदी चित्रपटसृष्टीत बाप लेकाच्या अनेक जोड्या आहेत. वडिलांनी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर लेकानंही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टी गाजवलीय. यांत आणखी एका बाप-लेकाच्या जोडीचा समावेश होतोय. ही जोडी म्हणजे अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर. अनिल कपूर यांच्याप्रमाणेच हर्षवर्धननंही बॉलिवुडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान आणि ओळख निर्माण करावी असं फॅन्सना वाटतंय. मात्र फॅन्सच्या या अपेक्षांचं ओझं हर्षवर्धननं घेतलेलं नाही. कोणत्याही प्रकारचे दडपण आपल्यावर नसल्याचं हर्षवर्धनला वाटतंय. प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी घडते यावर बरंच काही अवलंबून असतं असं त्याला वाटतं. प्रत्येक गोष्टीचे चांगले वाईट परिणाम असतात त्यामुळं पापा अनिल कपूर यांच्या नावाचे आणि त्यांच्याभोवती असलेल्या वलयाचं दडपण वाटत नसल्याचंही हर्षवर्धनं स्पष्ट केलंय.  
 

Web Title: Special person who came to greet Harsh Vardhan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.