Spider Man Trailer: शुबमन गिलची नवी इनिंग; स्पायडर मॅन चित्रपटात दिला आवाज, पाहा धमाकेदार ट्रेलर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 06:33 PM2023-05-18T18:33:21+5:302023-05-18T18:35:19+5:30

Spider Man Trailer: क्रिकेटर शुबमन गिलने स्पायडर मॅनच्या हिंदी आणि पंजाबी व्हर्जनमध्ये आवाज दिला आहे.

Spider Man Trailer: Shubman Gill's New Innings; gave voice for Spider-Man movie, watch trailer | Spider Man Trailer: शुबमन गिलची नवी इनिंग; स्पायडर मॅन चित्रपटात दिला आवाज, पाहा धमाकेदार ट्रेलर...

Spider Man Trailer: शुबमन गिलची नवी इनिंग; स्पायडर मॅन चित्रपटात दिला आवाज, पाहा धमाकेदार ट्रेलर...

googlenewsNext

Spider Man Trailer Shubman Gill: 'स्पायडर-मॅन अक्रॉस द स्पायडर व्हर्स' या हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा कार्टून अॅक्शनपॅक्ड चित्रपट भारतातही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहे. हा देशभरातील एकूण 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल (Shubman Gill) या चित्रपटाचा भाग असणार आहे. त्याने चित्रपटात हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये आपला आवाज दिला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, हा संपूर्णपणे अ‍ॅक्शनने भरलेला आणि मनोरंजनाने परिपूर्ण आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हेली स्टेनफेल्ड, ऑस्कर आयझॅक आणि जॅक जॉन्सन यांच्यासह अनेक कलाकारांनी याच्या इंग्रजी आवृत्तीसाठी आवाज दिला आहे. हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ तेलुगू, गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात शुबमन गिलने स्पायडर मॅनच्या हिंदी आणि पंजाबी व्हर्जनला आवाज दिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी शुभमन खूप उत्साहित दिसला. यावेळी त्याने चाहत्यांचे मनोरंजनही केले. स्पायडर मॅन सीरीजचा हा चित्रपट एकाच वेळी 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे. याआधी एकही चित्रपट इतक्या भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला नाही. चित्रपट 1 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Spider Man Trailer: Shubman Gill's New Innings; gave voice for Spider-Man movie, watch trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.