'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्याचं निधन, बाथरुममध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:46 PM2023-05-22T17:46:01+5:302023-05-22T17:46:42+5:30
प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput) याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे.
प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput) याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी अंधेरी येथील त्याच्या घरातील बाथरूममध्ये तो मृतावस्थेत आढळला. आदित्यच्या मित्राला तो इमारतीच्या ११ व्या मजल्यावर असलेल्या घरात मृतावस्थेत आढळला. यानंतर, मित्र आणि इमारतीच्या वॉचमेनने त्याला रुग्णालयात नेले, जिथे अभिनेत्याला मृत घोषित करण्यात आले. सूत्रांचे म्हणणे आहे की अभिनेत्याच्या मृत्यूमागे ड्रग्जचा ओव्हरडोस असू शकतो.
आदित्य सिंग राजपूतला पहिल्यांदा प्रसिद्धी टीव्ही रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सविला'मधून मिळाली. कास्टिंग डायरेक्टर म्हणून तो इंडस्ट्रीत प्रसिद्ध होता. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्य सिंग राजपूतने ३०० हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. अभिनयाच्या दुनियेत संघर्ष करत त्याने स्वतःचा ब्रँड 'पॉप कल्चर' सुरू केला, ज्या अंतर्गत त्याने कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले.
आदित्य सिंग राजपूतचा जन्म दिल्लीत झाला. मात्र, त्यांचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे आहे. वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंग करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला त्याच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक मोठी बहीण आहे. लग्नानंतर त्यांची बहीण अमेरिकेत शिफ्ट झाली.
आदित्यने 'क्रांतिवीर', 'मैंने गांधी को नही मारा' सारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच तो CIA (CAMBALA Investigation Agencies) या टीव्ही शोमध्येही दिसला होता. आदित्य गेल्या काही काळापासून कास्टिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत होता. अशा स्थितीत मुंबईच्या पेज-थ्री पार्ट्यांमधून त्यांची फिल्मी दुनियेत चांगलीच पकड असल्याचे मानले जाते.