​या 'स्पाय थ्रिलर' चित्रपटांची बॉक्स आॅफिसवर धमाल !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 07:16 AM2018-05-14T07:16:44+5:302018-05-14T12:46:44+5:30

-रवींद्र मोरे  बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर आधारित चित्रपट बनविण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. गेल्या काही वर्षात बरेच देशभक्तीचे ज्ञान देणारे चित्रपट ...

This 'Spy Thriller' Movie Boxes at the Box Office! | ​या 'स्पाय थ्रिलर' चित्रपटांची बॉक्स आॅफिसवर धमाल !

​या 'स्पाय थ्रिलर' चित्रपटांची बॉक्स आॅफिसवर धमाल !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर आधारित चित्रपट बनविण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. गेल्या काही वर्षात बरेच देशभक्तीचे ज्ञान देणारे चित्रपट बघावयास मिळाले आणि स्पाय थ्रिलर चित्रपटदेखील याच आशयाशी निगडित आहेत. अशा चित्रपटात जबरदस्त सस्पेंस आणि थ्रिलचा अनुभव बघावयास मिळतो. विशेष म्हणजे दर्शकही या आशयाचे चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहतात, याचाच परिणाम हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरतात. आज अशाच काही स्पाय चित्रपटांबाबतचा हा वृत्तांत... 

* राजी
Related image
काळानुसार बदल होत बॉलिवूडमध्ये कित्येक स्पाय थ्रिलर चित्रपटांची निर्मिती झाली आहे. ज्यापैकी आलिया भट्ट स्टारर ‘राजी’ चित्रपट होय. अलिकडेच रिलीज झालेल्या ‘राजी’ चित्रपटाला दर्शकांची खूपच पसंती मिळत आहे. गुप्तहेर रहस्य, भारत-पाकिस्तान युद्धांचे राजकारण आणि वेगवान देशभक्तीपर कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे आलिया भट्टने या कथेस आपल्या भूमिकेतून योग्य न्याय दिला आहे. 

* बेबी
Image result for baby movie
अक्षय कुमार, तापसी पन्नू, मनोज वाजपेयी सारखे दिग्गज स्टार्सचा ‘बेबी’ हा स्पाय चित्रपट दर्शकांना खूपच आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर मोठी कमाई करत धमालच केली होती. नीरज पांडे दिग्दर्शित ७५ कोटी बजेटच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स आॅफिसवर सुमारे ११० कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. 

* एक था टायगर
Related image
स्पाय थ्रिलरचा विषय सुरु असेल तर सलमान खान स्टारर ‘एक था टायगर’ या चित्रपटाचे नावही आवर्जून घ्यावे लागेल. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाने दर्शकांचे खूपच एंटरटेन केले आणि बॉक्स आॅफिसदेखील दणाणून सोडले होते. सलमान आणि कॅटरिनाची जोडी या चित्रपटाद्वारे पुन्हा पडद्यावर बघावयास मिळाली होती. विशेष म्हणजे या दोघांची केमिस्ट्री दर्शकांना खूपच भावली होती. ९२ कोटी बजेटच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स आॅफिसवर सुमारे २६० कोटीची कमाई केली होती.  
 
* मद्रास कॅफे 
Related image
जॉन अब्राहमनेदेखील स्पाय थ्रिलर चित्रपटांत आपले नशिब आजमावले आहे. राजीव गांधी यांच्या असोसिएशनच्या प्रकरणांवर बनलेल्या मद्रास कॅफे या चित्रपटात जॉन अब्राहमने स्पायची भूमिका साकारली होती. शूजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटाने दर्शकांचे खूपच मनोरंजन केले होते. या चित्रपटाने भारतीय बॉक्स आॅफिसवर सुमार ६० कोटीची कमाई केली होती. 

* डी डे
Image result for d day movie
हा बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वात अंडररेटेड स्पाय थ्रिलर चित्रपट होय. हा चित्रपट एक स्पाय ग्रुपच्या बाबतीत आहे, जो एका डॉनला भारतात आणून न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हा एक उत्कृष्ट चित्रपट होता. २०१३ मध्ये आलेल्या या चित्रपटात अर्जून रामपाल, श्रुती हासन, हुमा कुरेशी, इरफान खान, ऋषी कपूर आदी स्टार्स होते. या चित्रपटानेही बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. 

Web Title: This 'Spy Thriller' Movie Boxes at the Box Office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.