लेक जान्हवी कपूरच्या ‘धडक’मध्ये या खास भूमिकेत दिसू शकते श्रीदेवी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 05:34 AM2017-11-17T05:34:08+5:302017-11-17T11:04:08+5:30
गत बुधवारी करण जोहरने जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाचे फर्स्ट लूक रिलीज केले आणि काल ...
ग बुधवारी करण जोहरने जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाचे फर्स्ट लूक रिलीज केले आणि काल गुरुवारी चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली. ‘धडक’चे फर्स्ट लूक लोकांना जाम आवडले. या पोस्टरवरची जान्हवी व ईशान या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावली. त्यामुळेच हा चित्रपट जान्हवीसाठी एक यशस्वी लाँचिंग पॅड सिद्ध होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. तूर्तास ‘धडक’ या चित्रपटाबद्दलच्या चर्चांना ऊत आला आहे. अशीच एक चर्चा आहे. चर्चा काय तर, श्रीदेवीच्या कॅमिओची. होय, लेक जान्हवी कपूरच्या या डेब्यू सिनेमात श्रीदेवी कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांचे मानाल तर, ‘धडक’मध्ये मुलीच्या आईची एक लहानशी पण तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. या आईच्या भूमिकेच्या चौकटीत श्रीदेवी अगदी फिट बसते. त्यामुळेच या चित्रपटात श्रीदेवी आपल्या लेकीच्याच ‘रिल मदर’ची भूमिका साकारताना दिसू शकते. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण असे झाले तर जान्हवी व श्रीदेवी या मायलेकींना एकत्र पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत तयार होणारा हा चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करणार आहे. सूत्रांच्या मते, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी करणने शशांकवर सोपवली, यामागे एक खास कारण आहे. शशांतला लहान शहरातील प्रेमाची चांगली जाण आहे, असे करणचे मत आहे. यापूर्वी धर्मा प्रॉडक्शनसाठी ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ आणि ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन शशांकनेच केले होते. हे दोन्ही चित्रपट कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यामुळेच ‘धडक’ची जबाबदारीही शशांकच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
ALSO READ : पोस्टर रिलीज! अखेर श्रीदेवीच्या लेकीच्या ‘डेब्यू’चा मुहूर्त ठरला; पाहा, जान्हवी कपूर व ईशान खट्टरची गजब केमिस्ट्री!!
‘धडक’ हा चित्रपट ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, असे सांगण्यात येतेय. पण ‘धडक’ची कथा ‘सैराट’पेक्षा बरीच वेगळी असेल, असे सांगण्यात येत आहे. ‘सैराट’ अतिशय साधारण पद्धतीने बनवण्यात आला होता. पण ‘धडक’मध्ये मात्र ग्लॅमरचा तडका लावण्यात येणार आहे. आपल्या मुलीचे ग्रॅण्ड लॉन्चिंग व्हावे, असे श्रीदेवी व बोनी कपूर यांचे मत आहे. त्यामुळेच कदाचित करणने ‘सैराट’च्या स्क्रिप्टमध्ये बरेच बदल केले आहेत.