श्रीदेवी यांनी अमिताभ यांच्यासोबत सिनेमा करण्यास दिला होता नकार, मग बिग बींनी काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:03 IST2025-01-23T11:40:51+5:302025-01-23T12:03:05+5:30

श्रीदेवी यांनी अमिताभ यांच्यासोबत सिनेमा करण्यास दिला होता नकार, मग बिग बींनी जे केलं ते जाणून थक्क व्हाल!

Sridevi Refused To Work With Amitabh Bachchan And The Superstar Sent Her Truck Full Of Roses | श्रीदेवी यांनी अमिताभ यांच्यासोबत सिनेमा करण्यास दिला होता नकार, मग बिग बींनी काय केलं?

श्रीदेवी यांनी अमिताभ यांच्यासोबत सिनेमा करण्यास दिला होता नकार, मग बिग बींनी काय केलं?

Sridevi: श्रीदेवी भारतीय सिनेविश्वातील पहिल्या महिला सुपरस्टार होत्या. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. आजही त्याच्या आठवणीने त्याचे चाहते भावूक होतात. प्रेक्षक, चाहते यांच्या मनात श्रीदेवी यांच अजूनही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. श्रीदेवी यांचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक किस्सा आज आपण जाणून घेऊया. 

श्रीदेवी यांनी बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक हीट चित्रपट दिले. त्यांनी जवळपास सर्व अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची जोडी प्रेक्षकांना पसंत होती. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघेही 'इन्किलाब' आणि 'आखरी रास्ता' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. तुम्हाला माहितेय जेव्हा तिसरा चित्रपट अमिताभ यांच्यासोबत श्रीदेवी यांना ऑफर झाला, तेव्हा त्यांनी तो करण्यास नकार (Sridevi Refused To Work With Amitabh Bachchan) दिला होता. 

१९९१ मध्ये मुकुल आनंद यांनी 'खुदा गवाह' चित्रपटाची पटकथा घेऊन अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधला. या चित्रपटात श्रीदेवी यांना कास्ट करण्याचं त्यांनी ठरवलं. पण, श्रीदेवीसारख्या अभिनेत्रीला पटवून देणे सोपे काम नव्हते. अशा परिस्थितीत  श्रीदेवी यांना मनवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी एक खास पद्धत अवलंबली. दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांनी 'श्रीदेवी: द इटरनल स्क्रीन गॉडेस' या पुस्तकात हवाला सांगितलं होतं की, अमिताभ यांनी श्रीदेवीला गुलाबांनी भरलेला ट्रक (Amitabh Bachchan Sent  Truck Full Of Roses To Sridevi) पाठवला होता.  तो ट्रक श्रीदेवीजवळ रिकामा करण्यात आला आणि काही वेळातच श्रीदेवी गुलाबांच्या फुलांनी वेढल्या गेल्या. इतके गुलाब पाहून श्रीदेवी आनंदी झाल्या. 

अमिताभ बच्चन यांची ही पद्धत श्रीदेवी यांना खूप आवडली. पण चित्रपटात काम करण्यास होकार देण्यापूर्वी श्रीदेवी यांनी  आई आणि मुलगी अशा दोन्ही भूमिका करणार अशी अट ठेवली.  त्यावेळी पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसण्याचा विचार करत होती. तरीही तीती अट आमिताभ यांनी मान्य केली. 'खुदा गवाह'चे चित्रीकरण अफगाणिस्तानातील दोन शहरे काबूल आणि मजार-ए-शरीफ येथे झाले होते.

Web Title: Sridevi Refused To Work With Amitabh Bachchan And The Superstar Sent Her Truck Full Of Roses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.