श्रीदेवीवर नाराज झाली होती लेक जान्हवी कपूर, वाईट ‘मॉम’ म्हणत तीन दिवस धरला होता अबोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 06:47 AM2018-02-25T06:47:31+5:302018-02-25T12:17:31+5:30
‘सदमा, चांदनी, मिस्टर इंडिया, नागिन, इंग्लिश-विंग्लिश आणि मॉम’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री श्रीदेवी हिने जगाचा निरोप घेतला आहे. ...
‘ दमा, चांदनी, मिस्टर इंडिया, नागिन, इंग्लिश-विंग्लिश आणि मॉम’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री श्रीदेवी हिने जगाचा निरोप घेतला आहे. श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी आपल्या ‘मॉम’चे चित्रपट बघून लहानाच्या मोठ्या झाल्या. एकदा श्रीदेवी यांनीच जान्हवीशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. कमल हासन आणि श्रीदेवी यांच्या ‘सदमा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. जेव्हा श्रीदेवी ‘मॉम’चे प्रमोशन करीत होती, तेव्हा तिने या चित्रपटाशी संबंधित एक मोठा खुलासा केला.
श्रीदेवीने म्हटले होते की, जेव्हा जान्हवी सहा वर्षाची होती तेव्हा तिने ‘सदमा’ हा चित्रपट बघितला होता. हा चित्रपट बघितल्यानंतर जान्हवीने तब्बल तीन दिवस श्रीदेवीसोबत अबोला धरला होता. जान्हवीने श्रीदेवीला म्हटले होते की, ‘तू खूप वाईट आई आहेस. तू त्यांच्यासोबत (कमल हासन) चांगले केले नाहीस. दरम्यान ‘मॉम’ या श्रीदेवीच्या करिअरमधील ३०० वा चित्रपट होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जबरदस्त कौतुक केले गेले. समीक्षकांनी देखील तिचे तोंडभरून कौतुक केले होते.
त्यामुळे या सुपरस्टार अभिनेत्रीच्या अशा अचानक एक्झिटमुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. वास्तविक श्रीदेवीला मुलगी जान्हवीला तिच्यापेक्षाही मोठी अभिनेत्री म्हणून बघायचे होते. तिने तिच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रचंड तयारीदेखील केली होती. जान्हवीला लॉन्च करण्याची जबाबदारी श्रीदेवीने निर्माता करण जोहरवर सोपविली होती. परंतु आपल्या लेकीचे यश बघण्याअगोदरच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला.