श्रीदेवींचे पार्थिव दुपारपर्यंत मुंबईत आणणार! चाहत्यांची घालमेल वाढली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 04:28 AM2018-02-26T04:28:53+5:302018-02-26T09:59:51+5:30
बॉलिवूडच्या आकाशातील ‘चांदनी’ श्रीदेवी शनिवारी निखळली. वयाच्या ५४ व्या वर्षी दुबईत श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेत, तमाम चाहत्यांना अलविदा म्हटले. ...
ब लिवूडच्या आकाशातील ‘चांदनी’ श्रीदेवी शनिवारी निखळली. वयाच्या ५४ व्या वर्षी दुबईत श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेत, तमाम चाहत्यांना अलविदा म्हटले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश स्तब्ध असताना श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली आहे. त्यांच्या मुंबईस्थित वर्सोवा येथील बंगल्याबाहेर पहाटेपासूनच चाहत्यांनी गर्दी केली आहे. अद्याप श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत पोहोचलेले नाही. दुपारपर्यंत ते मुंबईत आणण्यात येणार असल्याचे कळतेय.
श्रीदेवींच्या निधनाला ३० तासांपेक्षा अधिक वेळ होऊनही अद्याप त्यांचे पार्थिव मुंबईत का आले नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सूत्रांच्या मते, दुबईत काही कायदेशीर प्रक्रिया लांबल्याने हा विलंब होत आहे. तथापि श्रीदेवींचे पार्थिव आणण्यासाठी एक खासगी जेट रविवारी दुपारीच दुबईत रवाना झाले आहे. हे विमान आज दुपारपर्यंत मुंबईत पोहोचेल, असे कळतेय. यानंतर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अर्थात अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
दुबईच्या Emirates Towers या हॉटेलात श्रीदेवी यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि यानंतर त्या बाथरूममध्ये बेशुद्ध होऊन पडल्या. यानंतर लगेच त्यांना दुबईच्या राशिद रूग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीअंतीच श्रीदेवींचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाला सोपवण्यात येणार आहे. दुबईत श्रीदेवींचे हजारो चाहते आहेत. दुबईमधील कायद्याप्रमाणे कुठल्याही परदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचा तपास केला जातो. त्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. तत्पूर्वी पोलिसांना कागदोपत्री सोपस्कारही पूर्ण करावे लागतात. त्याअंतर्गत संबंधित देशाच्या दुतावासाला माहिती दिली जाते. त्यानंतर दुतावासाकडून मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो आणि नो आॅब्जेक्शन सर्टिफिकेट जारी केले जाते. पोस्टमॉर्टेमनंतर येणाºया अहवालात मृत्यूचे कारण नमूद केले जाते. तसेच या कागदपत्रांवर पोलिसांची मोहोर लावलेली असते.
ALSO READ : श्रीदेवींच्या पार्थिवाचा पहिला फोटो व्हायरल! अनेकांना होऊ शकतात अश्रू अनावर!!
श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात त्या बालकलाकार म्हणून झळकली होत्या. अनेक पौराणिक सिनेमांमध्येही त्यांनी काम केले. १९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. लग्नानंतर श्रीदेवींनी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. पण अलीकडे ‘इंग्लिश -विंग्लिश’ आणि ‘मॉम’ या चित्रपटाद्वारे त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये परतल्या होत्या.