​श्रीदेवीच्या ‘मॉम’चे मोशन पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 07:32 AM2017-03-31T07:32:20+5:302017-03-31T13:02:20+5:30

श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ बनणार आहे. होय, लवकरच श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा येतो आहे. आज या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले. या चित्रपटात श्रीदेवी एका आईच्या भूमिकेतच दिसणार आहे.

Sridevi's Mom's Motion Poster Release | ​श्रीदेवीच्या ‘मॉम’चे मोशन पोस्टर रिलीज

​श्रीदेवीच्या ‘मॉम’चे मोशन पोस्टर रिलीज

googlenewsNext
िनेत्री श्रीदेवी सन २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली होती. केवळ कुटुंब हेच तिचे जग असते. आता श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ बनणार आहे. होय, लवकरच श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा येतो आहे. आज या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले. या चित्रपटात श्रीदेवी एका आईच्या भूमिकेतच दिसणार आहे. अर्थात यातील तिची भूमिका ‘इंग्लिश विंग्लिश’मधील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या चित्रपटात श्रीदेवी हिच्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. श्रीदेवीचा लाडका हबी बोनी कपूर हा या चित्रपटाचा निर्माता आहे. तर रवि उदयवार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. केवळ श्रीदेवी, नवाजुद्दीन व अक्षय खन्नाचा दमदार अभिनयच नाही तर या चित्रपटाचा आणखी एक प्लस पॉईन्ट असणार आहे. हा प्लस पॉईन्ट आहे, एआर रहमान यांचे संगीत. येत्या जुलैमध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येतो आहे.



ALSO READ : ​ श्रीदेवीची दुसरी मुलगी का आली चर्चेत ?

चित्रपटाच्या मोशन पोस्टरच्या ब्रॅकग्राऊंडमध्ये नवाजुद्दीनचा आवाज आपण ऐकू शकतो. जो आईच्या विविध रूपांबद्दल बोलतोय. ‘बदलते वक्त में भी नहीं बदलता उसका प्यार, बच्चों के लिए फूल सी वो दुश्मन के लिए तलवार।’असे नवाज यात म्हणतोय. यावरून ‘मॉम’ या चित्रपटात एक अनोखी कथा आपल्याला पाहायला मिळणार,याचा अंदाज येतो. श्रीदेवीने खुद्द हे मोशन पोस्टर शेअर केले आहे. आईच्या प्रेमाला काहीही मर्यादा नाही, असे तिने हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे. तेव्हा तुम्हीही बघा तर ‘मॉम’चे आगळे-वेगळे रूप...
 

Web Title: Sridevi's Mom's Motion Poster Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.