या दिवशी 'जवान' घरबसल्या पाहायला मिळणार, नेटफ्लिक्सने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 03:26 PM2023-10-30T15:26:27+5:302023-10-30T15:29:43+5:30

किंग खानच्या वाढदिवसानिमित्त नेटफ्लिक्स हे शाहरुखच्या चाहत्यांना मोठे सरप्राईज देण्याची योजना आखत आहे.

SRK's Jawan OTT Release Date Confirmed | या दिवशी 'जवान' घरबसल्या पाहायला मिळणार, नेटफ्लिक्सने दिली हिंट

या दिवशी 'जवान' घरबसल्या पाहायला मिळणार, नेटफ्लिक्सने दिली हिंट

किंग खान शाहरुखसाठी वर्ष 2023 हे लकी ठरलं आहे.  या वर्षात शाहरुखने बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट देत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाला जगभरात तुफान प्रतिसाद मिळालाय. प्रेक्षक सिनेमा पाहायला थिएटरमध्ये मध्ये गर्दी करत आहेत. पण जवान आता OTT वर कधी रिलीज होणार, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

'जवान' ने जवळपास दोन महिने चित्रपटगृहांवर राज्य केलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही रेकॉर्डब्रेक कमाई केली. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने 'जवान' चे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत. आता शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त नेटफ्लिक्स हे शाहरुखच्या चाहत्यांना मोठे सरप्राईज देण्याची योजना आखत आहे. यावर्षी शाहरुखचा 58 वा वाढदिवस आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्स आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर  शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पोस्ट करत आहे. आज नेटफ्लिक्सने 'कल हो ना हो' मधील एसआरकेचा फोटो शेअर केला आणि  किंग खानच्या वाढदिवसाला फक्त तीन दिवस बाकी आहेत, असे म्हटलं. असं म्हटलं जात आहे की, शाहरुख खानच्या वाढदिवसाला म्हणजेच २ नोव्हेंबरला 'जवान' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आता खरे काय ते शाहरूखच्या वाढदिवशीचं समोर येईल. चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 


शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला होता.  या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई केली. 'जवान' आता बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर आहे. जवानमध्ये प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: SRK's Jawan OTT Release Date Confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.