फक्त ‘RRR’च्या प्रोमोशनवर इतका कोटी खर्च झाला, सगळाच प्लान फुस्स झाला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:54 PM2022-01-05T12:54:24+5:302022-01-05T13:07:43+5:30

RRR Promotion : बाबो! ‘आरआरआर’च्या प्रमोशनच्या खर्चाचा आकडा वाचून थक्क व्हाल, इतक्या पैशात घेता येतील दोन फ्लॅट!!

SS Rajamouli Wasted An Insane Amount Of Money On 'RRR' Promotions | फक्त ‘RRR’च्या प्रोमोशनवर इतका कोटी खर्च झाला, सगळाच प्लान फुस्स झाला...!

फक्त ‘RRR’च्या प्रोमोशनवर इतका कोटी खर्च झाला, सगळाच प्लान फुस्स झाला...!

googlenewsNext

RRR Promotion : देशात कोरोनाचा कहर वाढत आहे आणि याचा सर्वाधिक फटका एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला बसतोय. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान शूटींग बंद, चित्रपटगृह बंद झाल्याने फिल्ममेकर्सचं अतोनात नुकसान सोसावं लागलं. आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असताना, बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीत चिंतेचं वातावरण आहे. अनेक मेकर्सनी त्यांच्या चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत. एस. एस. राजमौली (SS Rajamouli) त्यापैकीच एक़ राजमौलींचा 401 कोटींचा ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा सिनेमा बनून तयार आहे. येत्या 7 जानेवारीला हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाची स्थिती बघता त्याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवर केलेला कोट्यावधीचा खर्चही पाण्यात गेला आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, होय, राजमौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या प्रमोशनवर आत्तापर्यंत 18 ते 20 कोटी रूपये खर्च झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास प्लान आखण्यात आला होता. अगदी रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या फॅन्सला आंध्रप्रदेशाबाहेर नेऊन त्यांच्या माध्यमातून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्याचा प्लान होता. यावर 2 ते 3 कोटी बजेट वेगळा ठेवला गेला होता. मुंबई व अन्य मोठ्या शहरात अलिशान हॉटेलमध्ये या फॅन्सची राहायची व्यवस्था करण्यात आली होती. पण या सगळ्यावर आता पाणी फेरलं गेलं आहे.

तूर्तास प्रमोशनचे सगळे बेत रद्द करण्यात आले आहेत. साहजिकच निर्मात्यांना हा मोठा फटका मानला जातोय.

एका मुलाखती दरम्यान एस.एस. राजमौली  या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलले होते. ‘आम्ही 65 रात्रींपर्यंत आरआरआरच्या इंटरव्हलच्या सीक्वेंसचं शूटींग करत होतो. अशात शेकडो कलाकार होते ज्यांना वेगवेगळ्या देशातून बोलवण्यात आलं होतं. प्रत्येक रात्रीच्या शूटींगचा खर्च 75 लाख रुपए होता, असं त्यांनी सांगितलं होतं.
याच्या कथानकाबाबत सांगायचं तर सिनेमात अल्लूरी सीताराम राजू आणि कोमारम भीम यांच्या जीवनावर आधारीत कथा आहे. या सिनेमाचे नॉर्थ इंडियन राइट्स 140कोटी रूपयांना विकले गेले आहेत. या डीलनंतर सिनेमाने रिलीजआधीच 890 कोटी रूपयांचा बिझनेस केल्याचा दावा केला जात आहे. 

Web Title: SS Rajamouli Wasted An Insane Amount Of Money On 'RRR' Promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.