एस. एस. राजमौलींचा 'आरआरआर' सिनेमा रिलीज आधीच इतिहास रचायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 09:00 AM2019-02-01T09:00:00+5:302019-02-01T09:00:00+5:30

एस. एस. राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत

S.S.Rajmauli 's RRR movie ready to create history | एस. एस. राजमौलींचा 'आरआरआर' सिनेमा रिलीज आधीच इतिहास रचायला तयार

एस. एस. राजमौलींचा 'आरआरआर' सिनेमा रिलीज आधीच इतिहास रचायला तयार

googlenewsNext
ठळक मुद्देया सिनेमाचा बजेट 300 कोटी रुपयांचा आहेतेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहे

एस. एस. राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. 300 कोटी या सिनेमाचा बजेट आहे. त्यामुळे निर्मात्याने सिनेमाचे सॅटेलाईट राइट्स 250 कोटींच्या खाली देण्यास नकार दिला आहे. याआधी रजनीकांत यांचा 2.0चे  सॅटेलाईट राइट्स 170 कोटींना विकले गेले होते. त्यामुळे ‘आरआरआर’चे सॅटेलाईट राइट्स 250 कोटींना विकले गेले तर हा एक वेगळा रेकॉर्ड असेल. 

राजामौली यांनी 18 वर्षांच्या करिअरमध्ये 11 पेक्षा हीट सिनेमा दिले आहे. बाहुबली या त्यांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. या सिनेमा फक्त भारतात नाही तर परदेशात ही तितकचा हीट गेला.'बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ बनवून भारतीय सिनेमा एका नव्या उंचीवर घेऊन गेले.

आहे. राजमौली यांनी या सिनेमाच्या तयारीसाठी एनटीआर आणि राम चरण तेजा यांना अमेरिकेत पाठवले होते. ‘आरआरआर’  नोव्हेंबरमध्ये पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहे आता दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरु आहे. रामचरण तेजा साहजिकच प्रचंड उत्सूक आहे. ‘ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. राजमौली यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो,’ असे तो म्हणाला. रामचरण तेजा हा सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. तर एनटीआर ज्युनिअर साऊथचे महानायक एनटीआर यांचे चिरंजीव आहेत. ‘आरआरआर’बाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा  2020 मध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर रिलीज होणार.  

Web Title: S.S.Rajmauli 's RRR movie ready to create history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.