Star Cast Fees: अजय देवगणपासून तब्बू पर्यंत, Drishyam 2साठी कलाकारांनी घेतलं इतकं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 02:15 PM2022-11-18T14:15:43+5:302022-11-18T14:17:04+5:30

Ajay Devgan Drishyam 2: बॉलिवूड चित्रपट दृश्यम 2 सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दृश्यम 2साठी स्टार कास्ट अजय देवगण आणि तब्बूसह सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी चांगलं मानधन घेतले आहे.

Star Cast Fees: From Ajay Devgn to Tabu, Here's what the actors took for Drishyam 2 | Star Cast Fees: अजय देवगणपासून तब्बू पर्यंत, Drishyam 2साठी कलाकारांनी घेतलं इतकं मानधन

Star Cast Fees: अजय देवगणपासून तब्बू पर्यंत, Drishyam 2साठी कलाकारांनी घेतलं इतकं मानधन

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' ( Drishyam 2 ) चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये रिलीज झाला होता. सस्पेन्स थ्रिलर पटकथा असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. तब्बल 7 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अभिषेक पाठक यांनी केले आहे. 'दृश्यम'ला मिळालेल्या सक्सेसनंतर कलाकरांनी 'दृश्यम 2' साठी किती मानधन घेतलं असा प्रश्न अनेकांना आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणने या चित्रपटासाठी 30 कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर तब्बूने या चित्रपटासाठी 3.5 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रेया सरन हिने (Shriya Saran) या चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाने (Akshay Khanna) देखील महत्त्वाची भूमिका बजावली असून त्याने या चित्रपटासाठी 2.5 कोटी मानधन घेतले आहे. अभिनेत्री ईशिता दत्ताने या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली. ही भूमिका साकारण्यासाठी ईशिताने 1.2 कोटी फी घेतली आहे. 


'दृश्यम 2' चित्रपटात अजयसोबत तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेत पाठक यांनी केले आहे. 'दृश्यम'च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केले होते. 2020 मध्ये त्याचे निधन झाले. 'दृश्यम 2' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 

Web Title: Star Cast Fees: From Ajay Devgn to Tabu, Here's what the actors took for Drishyam 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.