...या स्टारगर्ल्सनी निवडली वेगळी वाट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2017 10:57 AM2017-06-23T10:57:44+5:302017-06-23T16:35:13+5:30

सारा अली खान, जान्हवी कपूर, सुहाना खान, कृष्णा श्रॉफ, पलक तिवारी ही बॉलिवूडची स्टारगर्ल गॅँग सध्या त्यांच्या बॉलिवूड डेब्यूवरून ...

... this stargreen selected! | ...या स्टारगर्ल्सनी निवडली वेगळी वाट!!

...या स्टारगर्ल्सनी निवडली वेगळी वाट!!

googlenewsNext
रा अली खान, जान्हवी कपूर, सुहाना खान, कृष्णा श्रॉफ, पलक तिवारी ही बॉलिवूडची स्टारगर्ल गॅँग सध्या त्यांच्या बॉलिवूड डेब्यूवरून जबरदस्त चर्चेत आहे. आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा पुढे चालविण्यासाठी या स्टार गर्ल सज्ज असून, लवकरच त्यांच्या अभिनयाचा जलवा प्रेक्षकांना बघावयास मिळू शकतो. मात्र स्टारगर्ल अशाही आहेत, ज्यांनी आपली वेगळी वाट निवडली आहे. आई-वडिलांकडून मिळालेला वारसा पुढे न घेऊन जाता, वेगळ्या क्षेत्रात छाप उमटून त्यांनी आई-वडिलांचा लौकिक वाढविला आहे. अशाच स्टारगर्लसच्या यशाचा आढावा घेणारा हा वृत्तात...



श्वेता नंदा
महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकतो, असा सर्वसामान्यांचा समज झाल्यास काही वावगे वाटू नये. परंतु अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा यांनी अभिनयाची कास न धरता वेगळी वाट निवडली आहे. वास्तविक श्वेताला लहानपणापासूनच अभिनयाचा शौक होता. शाळेमधील नाटकांमध्ये ती आवर्जुन भाग घेत असे. एकदा तर तिने नाटकासाठी प्रचंड तयारी केली होती, परंतु जेव्हा ती स्टेजवर पोहोचली तेव्हा सगळे डायलॉग विसरून गेली होती. तेव्हाच श्वेताने निर्णय घेतला की, आता पुन्हा अभिनय करायचा नाही. मात्र श्वेताच्या सिल्व्हर स्क्रिनशी संबंधित आणखी एक रंजक तथ्य म्हणजे, जेव्हा जया शोलेची शूटिंग करीत होत्या, तेव्हा श्वेता त्यांच्या गर्भात होती. त्यामुळे श्वेताचा हा पहिला आणि अखेरचा चित्रपट म्हणावा लागेल. 



रिदिमा कपूर

एकेकाळी बॉलिवूड गाजविणारे ऋषी कपूर आणि नीतू कपूर या दाम्पत्याचा मुलगा रणबीर कपूर आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. मात्र मुलगी रिदिमा कपूर हिने कधीही चित्रपटांमध्ये येण्याचा विचार केला नाही. ती नेहमीच या झगमगटापासून दूर राहिली आहे. माध्यमांमध्येही रिदिमा खूपच कमी वेळा झळकली आहे. रिदिमाने मायानगरी मुंबई सोडून दिल्ली गाठली असून, याठिकाणी ती पतीसोबत राहते. रिदिमा एक यशस्वी इंटिरिअर डिझायनर आहे. 



रीमा कपूर

शो मॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांचा तर मुली आणि सुनांना चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवातीपासूनच विरोध होता. राज कपूर यांना रितु नंदा आणि रीमा कपूर अशा दोन मुली होत्या. रिमा कपूर आता रिमा कपूर जैन आहेत. असे म्हटले जात आहे की, कधीकाळी रिमा कपूर आणि राजेंद्रकुमार यांचा मुलगा कुमार गौरव यांनी साखरपुडा करून लग्न केले होते. मात्र त्याचदरम्यान कुमार गौरव अभिनेत्री विजेयता पंडितच्या प्रेमात पडला. त्यामुळे कुमार आणि रीमा कपूर यांचे लग्न तुटले. मात्र रीमा कपूर यांनी कधीही इंडस्ट्रीत येण्याचा विचार केला नाही. 



त्रिशाला
संजय दत्त पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी त्रिशालाला चित्रपटांमध्ये काम करू देण्याच्या विरोधात आहे. संजूबाबाने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर त्रिशाला चित्रपटांमध्ये आली तर मी तिचे पाय तोडणार. सध्या त्रिशाला लंडन येथे आपल्या आजी-आजोबांकडे असून, त्याठिकाणी ती विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहे. संजूबाबाच्या मते, त्रिशालाने याच क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी. त्रिशाला संजूबाबाच्या खूप क्लोज आहे. 



मसाबा

आपल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांना मुलगी मसाबा हिने बॉलिवूडमध्ये करिअर करावे असे अजिबात वाटत नाही. मसाबाला डान्स आणि म्युझिकची प्रचंड आवड होती. तसेच तिला प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक डावर यांचा ग्रुपही ज्वाइन करायचा होता. परंतु नीना मसाबाच्या या निर्णयाविरोधात होत्या. अखेर मसाबाला तिच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले. सध्या मसाबा उभरती फॅशन डिझायनर आहे. 

Web Title: ... this stargreen selected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.