रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, लवकरच सुरू करणार दुसरं शेड्युल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:24 PM2024-08-02T16:24:10+5:302024-08-02T16:24:46+5:30

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) या चित्रपटाची सध्या चर्चा आहे.

starring Ranbir Kapoor Nitesh Tiwari's Ramayana Part 1 wrapped up second schedule will start soon | रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, लवकरच सुरू करणार दुसरं शेड्युल!

रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, लवकरच सुरू करणार दुसरं शेड्युल!

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. पौराणिक महाकाव्यावर आधारित हा चित्रपट दोन भागात विभागला जाणार असल्याचं बोललं जातं आहे. पहिल्या भागाचं शुटिंग पुर्ण झालं असून चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलची तयारी सुरू झाली. रणबीर कपूर ऑगस्टपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

ईटाईम्सनुसार चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण झालं असून VFX काम सुरू झाले आहे. आता निर्माते दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात भगवान राम, सीता यांचं बालपण आणि त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास पाहायला मिळेल. तर दुसऱ्या भागात 14 वर्षांचा वनवास आणि रावणविरुद्धचं युद्ध दिसेल.  दुसऱ्या भागाचे शूटिंग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

नितेश तिवारी यांनी पटकथेची मागणी आणि पात्रांची सखोल मांडणी करण्यासाठी हा चित्रपट दोन भागात बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर हा श्रीराम यांच्या भुमिकेत तर साई पल्लवी ही सीतेच्या रुपात पाहायला मिळणार आहे.  रावणच्या भूमिकेत यश, कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता आणि हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल असे मोठे कलाकार या सिनेमात असणार आहेत. एवढचं नाही तर या चित्रपटात प्रसिद्ध टीव्ही शो 'रामायण'मालिकेतील अरुण गोविल राजा दशरथ यांची भूमिका साकारत आहेत.

'रामायण'  ८३५ कोटी रुपयांच्या मेगा बजेटसह तयार केले जात आहे. हे वृत्त खरे ठरले तर हा चित्रपट भारतातील सर्वात महागडा चित्रपट ठरेल.  सध्या, भारतातील सर्वात मोठा बजेट चित्रपट कल्की २८९८ एडी आहे, तो ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 

Web Title: starring Ranbir Kapoor Nitesh Tiwari's Ramayana Part 1 wrapped up second schedule will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.