स्टाईल में रहने का, इरफानचा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 07:00 AM2017-05-16T07:00:06+5:302017-05-16T12:30:06+5:30
अभिनेता इरफान खाननं आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आहेत. पिकू, पानसिंग तोमर, तलवार अशा विविध सिनेमांमधील इरफाननं साकारलेल्या भूमिका ...
अ िनेता इरफान खाननं आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आहेत. पिकू, पानसिंग तोमर, तलवार अशा विविध सिनेमांमधील इरफाननं साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका आणि कायम नवनवीन गोष्टी करणं हे इरफानची खासियत म्हणावी लागेल. अभिनय कौशल्यासोबतच फॅशनचीही इरफानला चांगलीच जाण आहे. फॅशन, फॅशन सेन्स, फॅशन स्टाईल हेही तितकंच महत्त्वाचं असल्याचं इरफानला माहिती आहे. त्यामुळे इरफानच्या अभिनयासोबत त्याच्या फॅशनची चर्चा होतच असते. लवकरच इरफानचा 'हिंदी मीडियम' नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात इरफानची वेगळी भूमिका रसिकांना पाहायला मिळेल. त्यामुळे सिनेमाविषयी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या सिनेमाच्या इरफान सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशन दरम्यान पुन्हा एकदा रसिकांना त्याची अनोखी स्टाईल पाहायला मिळाली. विविध ठिकाणी वेगवेगळ्या कपड्यांमध्ये इरफान हजेरी लावतो आहे. त्यातील ब्लेझर आणि ट्राऊसर, शर्ट आणि सँडल्स त्यानं परिधान केलं होतं. इरफानच्या कपड्यांमध्ये काळ्या रंगाचा सर्वात जास्त समावेश असतो. योग्य पॅटर्न आणि मोनोक्रॉम लूक्सही त्याच्या फॅशन स्टाईलची खासियत म्हणावी लागेल. फॅशन स्टायलिस्ट इशा भन्सालीच्या मदतीने विविध स्टाईल करत कायम वेगळेपण राखण्याचा इरफानचा प्रयत्न असतो. हाच प्रयत्न इरफानचा हिंदी मीडियम या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी सा-यांना पाहायला मिळाला. आता सिनेमातील भूमिकांप्रमाणे इरफानचे प्रमोशनच्या वेळचे हे सगळे लूक आणि स्टाईल रसिकांसाठी सुखद धक्का होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
'हिंदी मीडियम' या सिनेमात इरफान खान एक लहान मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत तर पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर या मुलीच्या आईची भूमिका साकारते आहे. सिनेमाचे दिग्दर्शन साकेत चौधरीने केले आहे.सिनेमात इरफान आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊ इच्छितो यासाठी तो तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न करत असतो.मुलीचे अॅडमिशन चांगल्या शाळेत व्हावे यासाठी इरफान आणि त्याची पत्नी त्यांचे लाईफ स्टाइल बदलतात. हिंदी मीडियम या चित्रपटातून एक गंभीर विषय अत्यंत हलक्या फुलक्या अंदाजात प्रेक्षकांनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.