आलिशान आहे आर. माधनवचे घर, जितके मॉडर्न तितकेच धार्मिक वातावरणही पाहायला मिळते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:47 AM2021-06-01T11:47:12+5:302021-06-01T11:52:57+5:30
बॉलिवूडमध्ये आर. माधवनने आत्तापर्यंत 'रहना है तेरे दिल में', 'रंग दे बसंती', 'रामजी लंदनवाले', '13बी', '3 इडियट्स', 'तनू वेड्स मनू' आणि 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा आज 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. माधवनचा जन्म 1 जून 1970 मध्ये जमशेदपूर येथे झाला. आर. माधवनने 2001 मध्ये दिग्दर्शक गौतम मेनन यांच्या 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2000 मध्ये 'Alaipayuthey' या सिनेमाद्वारे साउथ इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
बॉलिवूडमध्ये माधवनने आत्तापर्यंत 'रहना है तेरे दिल में', 'रंग दे बसंती', 'रामजी लंदनवाले', '13बी', '3 इडियट्स', 'तनू वेड्स मनू' आणि 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या प्रत्येक सिनेमातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आहे. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही माधवनमधील साधेपणा आजही कायम आहे. आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. अनेक हिट सिनेमा दिल्यानंतर माधनवनने कधीही मागे वळून पाहिले नाही. आजही तो आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
त्यामुळेच साधी राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे आज माधवनदेखील रसिकांचा फेव्हरेट अभिनेता बनला आहे.मनमौजी, आपल्याच धुंदीत आणि आपल्या अटी शर्तींवर जीवन जगणारे कलाकारही या चित्रपटसृष्टीत आहेत. त्यापैकी एक आर.माधवन आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यास नेहमी त्याच्या खास क्षणांचे फोटो तो चाहत्यांसह शेअर करत असतो. फोटोंच्या माध्यमातून त्याच्या घराचीही झलक पाहायला मिळते.
इतरांप्रमाणे माधनचेही घर असंच आलिशान आहे. मुंबईतील त्याच्या याच घराचे काही फोटो समोर आले आहेत. या घरात पत्नी, मुलगा आणि वडिलांसोबत तो राहतो. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. देवावरही त्याची प्रचंड श्रद्धा आहे. तो अनेकदा धार्मिक गोष्टी करतानाही फोटो शेअर करत असतो. मुलाह वडिलांसह धार्मिक विधी करताना दिसतो. यावरुन माधवनच्या घरातले वातावरणही जितके मॉडर्न तितकेच पारंपरिक असल्याचेही पाहायला मिळते. प्रत्येक धर्माचा आदर तो करतो.