आमिर खानने 22 वर्षानंतर सांगितली त्या ‘किसींग सीन’च्या पडद्यामागची कहाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 02:47 PM2018-06-04T14:47:03+5:302018-06-04T20:17:03+5:30
‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट रिलीज होऊन 22 वर्षे झालीत़ पण या चित्रपटातील एक सीन प्रेक्षक अजूनही विसरू शकलेले नाहीत.
‘ ाजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट रिलीज होऊन 22 वर्षे झालीत़ पण या चित्रपटातील एक सीन प्रेक्षक अजूनही विसरू शकलेले नाहीत. होय, करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्यातील किसींग सीनची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. कारण इतक्या मोठ्या किसींग सीनचा तो काळ नव्हताच. त्यामुळे
‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातील त्या सीनमुळे सगळीकडे एकच गहजब झाला होता. इतक्या वर्षांनी या सीनबद्दल बोलायचे कारण म्हणजे, अलीकडे आमिर यावर बोलला. या सीनमागची अख्खी कथा त्याने एका ताज्या मुलाखतीत सांगितली. आमिर तो सीन देताना असहज होता का? असे आमिरला यावेळी विचारले गेले.
आमिर यावर म्हणाला की, मुख्य प्रवाहातील चित्रपटांत तसा किसींग सीन अनेक दशकानंतर झाला होता. तो किसींग सीन लोकांना खूप मोठी गोष्ट वाटली होती. पण माझ्यासाठी ती खूप लहान गोष्ट होती. त्या कथेची ती मागणी होती. राजा व मेमसाब यांच्यातील जमीन-अस्मानाचा फरक होता. त्यांच्यात तसे नाते लोक विचारही करू शकत नव्हते. स्वत: मेमसाबचाही ती राजाच्या प्रेमात पडेल, यावर विश्वास नव्हता. म्हणूनच मनातून प्रेम करत असूनही मी त्याला चांगला मित्र मानते, असे ती सांगत असायची. मेमसाबला राजावर तिचे प्रेम आहे, याची जाणीव व्हावी, यासाठी तिच्याकडून ती फिजिकल रिअॅक्शन (किसींग) व्हावी, असे धर्मेश दर्शनचे(चित्रपटाचेदिग्दर्शक) मत होते. स्क्रिप्टची ती मागणी होती. त्यामुळेच मेमसाब आधी राजाला किस करते. हा सीन देताना मला वा करिश्मा अजिबात नव्हर्स नव्हतो. त्यावेळच्या प्रेक्षकांना समोर ठेवूनच आम्ही तो सीन दिला होता. त्यात आक्षेपार्ह काहीही नव्हते.
मी ‘जो जिता वही सिकंदर’मध्ये मी किसींग सीन दिला आहे. एक अभिनेता म्हणून मला असे सीन देताना कधीच अडचण आली नाही, असेही तो म्हणाला.
ALSO READ : ‘या’ व्यक्तीने आमिर खानला बॉलिवूडमध्ये केले लॉन्च; पाहा फोटो!