Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:24 PM2024-01-16T12:24:11+5:302024-01-16T12:25:13+5:30

Jackie Shroff: जॅकी श्रॉफने सुद्धा एका जुन्या राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ करुन या सोहळ्यात खारीचा वाटा उचलला आहे.

story-jackie-shroff-takes-part-in-cleanliness-drive-of-oldest-ram-temple-in-mumbai | Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या

Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या

बॉलिवूडचा भिडू अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) त्याच्या साधेपणामुळे कायम चाहत्यांची मन जिंकत असतो. बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा जॅकी श्रॉफ आजही अत्यंत सामान्य माणसासारखं आयुष्य जगतो. त्यामुळे चाहत्यांना त्याचं विशेष कौतुक आहे. इतकंच नाही तर त्याची देवावर सुद्धा तितकीच श्रद्धा आहे. सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जॅकी एका मंदिराच्या पायऱ्या धुतांना दिसत आहे.
 
सध्या सगळे देशवासी प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी करत आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. म्हणूनच, सध्या सगळे जण या दिवसाची तयारी करत आहेत. यामध्येच कलाकार मंडळी सुद्धा मागे नाहीत. जॅकी श्रॉफने सुद्धा एका जुन्या राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ करुन या सोहळ्यात खारीचा वाटा उचलला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ राम मंदिराच्या पायऱ्या स्वत:च्या हाताने धूवत आहे. सोबतच त्याने मंदिर परिसराची स्वच्छता केली. तेथील झाडांना पाणी घातलं.  दरम्यान, त्याचा हा साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी त्याला रिअल हिरो म्हटलं आहे. जॅकी श्रॉफ कायम समाजकार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा तो गरजूंना मदतदेखील करताना दिसतो.

Web Title: story-jackie-shroff-takes-part-in-cleanliness-drive-of-oldest-ram-temple-in-mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.