​‘रनिंग शादी डॉट कॉम’ची कथा लेखकाची नव्हे तर लोकांची - अमित राय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 01:55 PM2017-01-29T13:55:37+5:302017-01-29T19:25:37+5:30

अभिनेत्री तापसी पन्नू व अमित साध यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा ...

The story of 'Running Marriage.com' is not about the author but the people - Amit Rai | ​‘रनिंग शादी डॉट कॉम’ची कथा लेखकाची नव्हे तर लोकांची - अमित राय

​‘रनिंग शादी डॉट कॉम’ची कथा लेखकाची नव्हे तर लोकांची - अमित राय

googlenewsNext
िनेत्री तापसी पन्नू व अमित साध यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अर्थातच हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने याबद्दलच्या बातम्या चांगल्याच व्हायरल होत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शन अमित रॉय याने या चित्रपटाच्या कथेचा उलगडा करताना हा चित्रपट लेखकाने नव्हे तर स्थानिक लोकांनी लिहला आहे, असे सांगितले. 

‘रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटाच्या कथेवर प्रकाश टाकताना दिग्दर्शक अमित राय म्हणाला, हा चित्रपट तयार करताना आम्हाला स्थानिक लोकांची फार मदत झाली. या चित्रपटाची शूटिंग आम्ही पंजाबमध्ये करीत होतो. शूटिंग करीत असताना लोक मोठ्या संख्येन गोळा व्हायचे. ते आपसात बोलत होते. यातून या चित्रपटात कसे संवाद असावेत याची कल्पना आम्हाला सुचली. मी आणि या चित्रपटाचे सहलेखक नवजोत शूटिंगच्या वेळी लोकांशी बोलून संवाद तयार करीत होते. अमित म्हणाला, आमच्या जवळ अशी खूप उदाहरणे आहे, ज्याचे क्रेडिट आम्ही सर्वसामान्य लोकांना देऊ शकतो. लोकांनी आमच्या चित्रपटाची शूटिंग पाहिली व त्यांनी आम्हाला संवाद सुचविले. आमच्यासाठी ही चांगली गोष्ट ठरली आहे. कारण यामुळे चित्रपटात प्रामाणिकपणा आला आहे. Read More : तापसी पन्नू, अमित संध यांच्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’चा ट्रेलर रिलीज



‘भगायेंगे हम निभायेंगे आप’ असे स्लोगन असलेल्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’ ही एका लहान शहरातील लव्ह स्टोरी असून, याची कथा चांगली आहे. शूजित सिरकार प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू होते. दरम्यान शूजित सिरकार यांच्या दोन चित्रपट रिलीज झाले. तर तापसी पन्नूने देखील पिंक मध्ये जोरदार परफार्मन्स दिला आहे. ह्यरनिंग शादी डॉट कॉमह्ण या चित्रपटाची क था दोन तरुणांवर आधारित असून, दोघेही युवकांना लग्न व जोडीदार शोधून देण्यात मदत करतात. मात्र, ज्या जोडप्यांना इंटरकास्ट मॅरेज करायचे आहे, त्यांना घरून पळून जाण्यात व त्यांचे लग्न लावून देण्यात तापसी व अमित मदत करताना दिसणार आहेत. 

ALSO READ 
​अक्षयवर भाळली ही अभिनेत्री!
​शाहरुख खान म्हणतो, माझा मुलगा अबराम नव्या पिढीचा ‘सुपरस्टार’

Web Title: The story of 'Running Marriage.com' is not about the author but the people - Amit Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.