Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! २ दिवसांतच १०० कोटी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 11:36 AM2024-08-17T11:36:19+5:302024-08-17T11:37:08+5:30

थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाचं पहिल्या दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

Stree 2 Box Office collection shraddha kapoor movie crossed 100cr in 2 days | Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! २ दिवसांतच १०० कोटी पार

Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! २ दिवसांतच १०० कोटी पार

श्रद्धा कपूर, राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्त्री २' सिनेमाच्या चाहते प्रतिक्षेत होते. २०१८ साली प्रदर्शित झालेला स्त्री सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमानंतर स्त्री २ प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी(१५ ऑगस्ट) सर्वत्र प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाचं पहिल्या दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'स्त्री २'ने पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग केली. प्रदर्शनाच्या दिवशी श्रद्धा कपूरच्या सिनेमाने तब्बल ५१.८ कोटींचा गल्ला जमवला. यंदाच्या वर्षातील बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा 'स्त्री २' दुसरा सिनेमा ठरला आहे. जानेवारीत रिलीज झालेल्या हृतिक रोशनच्या फायटर सिनेमाने २४ कोटींची कमाई केली होती. 'स्त्री २'ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवरील जलवा कायम ठेवला आहे. 


या सिनेमाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळतंय.  स्त्री २ सिनेमाने दुसऱ्या दिवशी ३१.४ कमाई केली आहे. या सिनेमाने दोन दिवसांत देशभरात ९१.७ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या सिनेमाने दोनच दिवसात जगभरात १२५.०५ कोटी कमावले आहेत. 

'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या' या सिनेमांनंतर 'स्त्री २' या युनिव्हर्समधील पुढचा सिनेमा आहे. 'स्त्री २'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. या सिनेमात राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा धमाल करताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात कॅमिओ भूमिका करत असल्याने हा सिनेमा आणखी लोकप्रिय होईल यात शंका नाही. 'स्त्री २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: Stree 2 Box Office collection shraddha kapoor movie crossed 100cr in 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.