"ती चुडैल..." श्रद्धा कपूरबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक? करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:21 IST2025-04-06T17:21:09+5:302025-04-06T17:21:45+5:30
अमर कौशिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"ती चुडैल..." श्रद्धा कपूरबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक? करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना
बॉलिवूडची ब्लॉकबस्टर 'स्त्री' म्हणून आता श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिला ओळखलं जातं. श्रद्धाचं सौंदर्य आणि अभिनयाचे जगभरात लाखो चाहते आहेत. खऱ्या आयुष्यातील तिचा प्रेमळ आणि निरागस स्वभाव प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आहे. श्रद्धा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कधीही एखाद्या विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. कायम हसऱ्या स्वभावाच्या श्रद्धाबद्दल 'स्त्री 2' चे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी केलेली एक कमेंट तिच्या चाहत्यांना खटकली आहे. यामुळं अमर कौशिक यांच्यावर श्रद्धाचा चाहतावर्ग चांगलाच भडकला आहे.
श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटातील कास्टिंगबद्दल माहिती देतानाचा अमर कौशिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, "श्रद्धाच्या कास्टिंगचे श्रेय पूर्णपणे दिनेश विजयन यांना जात. दिनेश आणि श्रद्धा यांची भेट एका प्रवासादरम्यान झाली होती. त्यावरून दिनेश यांनी मला श्रद्धा ही चेटकिणीसारखी हसते असं सांगितलं. अमर कौशिक श्रद्धाची माफी मागत पुढे म्हणाले, "माफ कर श्रद्धा. म्हणून, जेव्हा मी श्रद्धाला भेटलो तेव्हा मी तिला आधी हसण्यास सांगितलं होतं". श्रद्धा कपूरसंदर्भातील हा किस्सा अमर यांनी अगदी गमतीत सांगितला. पण, तो श्रद्धाच्या चाहत्यांना चांगलाच खटकला आहे.
First Apar, now him?! Is this some new trend where men from her own films diss her publicly? This is how you talk about your leading lady?? First they promoted the film on her name and after that talking sh!t!
— 💭 (@shraddhafan_grl) April 5, 2025
Shraddha deserves better team members!!pic.twitter.com/l1a1GXDjSZ
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, पंकज पाराशर दिग्दर्शित 'चालबाज इन लंडन' या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तर अमर उजालाच्या मते, श्रद्धा कपूरकडे 'धडकन २' आणि 'क्रिश ४' सारखे प्रोजेक्ट्स आहेत. परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून आदित्य आणि श्रद्धा एका प्रोजेक्टवर एकत्र काम करणार अशी चर्चा आहे.