'स्त्री २' मध्ये श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव काय? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:25 PM2024-10-07T12:25:38+5:302024-10-07T12:26:14+5:30

स्त्री २ च्या शेवटी श्रद्धा विकीच्या कानात म्हणजेच राजकुमारच्या कानात त्याला आपलं नाव सांगते.

Stree 2 director Amar Kaushik reveals what is the name of shraddha kapoor s character in stree 2 | 'स्त्री २' मध्ये श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव काय? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

'स्त्री २' मध्ये श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव काय? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या 'स्त्री २' (Stree 2) सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले आणि यंदाचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित सिनेमाने जवळपास ६०० कोटींची कमाई केली. अमर कौशिक यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. २०१८ साली आलेल्या 'स्त्री' सिनेमाचा हा सीक्वेल आहे. सिनेमात श्रद्धा कपूरचं (Shraddha Kapoor) नाव नक्की काय असतं हे अजूनही गुपितच राहिलं. नुकतंच यावर अमर कौशिक (Amar Kaushik) यांनी एक खुलासा केला.

'स्त्री' चे चाहते श्रद्धा कपूरच्या प्रेमातच पडले आहेत. तिच्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. तर दुसरीकडे राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या कॉमेडीने खूप हसवलं. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरची अनोखी केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते. स्त्री २ च्या शेवटी श्रद्धा विकीच्या कानात म्हणजेच राजकुमारच्या कानात त्याला आपलं नाव सांगते. हे नाव गुलदस्त्यातच आहे. यावर एका मुलाखतीत अमर कौशिक म्हणाले, "तिचं नाव म्हणजे एक मोठी मिस्ट्री आहे. मला वाटतं  तुम्हाला यासाठी बराच काळ थांबावं लागणार आहे. पूर्ण टीमने याबाबत खूप चर्चा केली. 

'स्त्री' चा सीक्वेल येण्यासाठी चाहत्यांना तब्बल ६ वर्ष वाट पाहावी लागली. आता 'स्त्री ३' कधी येणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. स्त्री २ मध्ये अक्षय कुमारचाही कॅमिओ होता. विशेष म्हणजे सिनेमाचा शेवट अक्षय कुमारवरच झाला. त्यामुळे तिसऱ्या भागात अक्षय व्हिलेनच्या भूमिकेत असू शकतो. तसंच यामध्ये वरुण धवनने देखील सिनेमात भेडियाच्या रुपात कॅमिओ केला.

Web Title: Stree 2 director Amar Kaushik reveals what is the name of shraddha kapoor s character in stree 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.