एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:03 AM2024-12-11T09:03:43+5:302024-12-11T09:04:09+5:30

काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता 'स्त्री २' फेम अभिनेता मुश्ताक खान यांच्याबरोबरही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

stree 2 fame actor mushtaq khan was kidnap demand for 1cr details inside | एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता 'स्त्री २' फेम अभिनेता मुश्ताक खान यांच्याबरोबरही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुश्ताक खान यांचं काही दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची माहिती त्यांचे बिजनेस पार्टनर शिवम यादव यांनी दिली आहे. एका कार्यक्रमासाठी जात असताना मुश्ताक खान यांच्याबरोबर हा प्रकार घडला. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील बिजनौर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मुश्ताक खान २० नोव्हेंबरला एका इव्हेंटसाठी मेरठला चालले होते. दिल्ली एअरपोर्टवरुन एक गाडी त्यांना मेरठला घेऊन जाणार होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मुश्ताक खान यांना घेऊन जाणारी गाडी मेरठला न जाता बिजनौरकडे वळली. तिथेच त्यांना १२ तास बांधून ठेवण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खान यांच्याकडे १ कोटींची खंडणी मागितली. पण, १ कोटी रुपये देऊ न शकल्याने मुश्ताक खान यांच्या मुलांनी २ लाख रुपये अपहरणकर्त्यांना ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सध्या ते ठीक असून संपूर्ण प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. 

मेरठला होणाऱ्या या इव्हेंटसाठी मुश्ताक खान यांना अॅडव्हानसमध्ये पैसे देण्यात आले होते. त्यांना विमानाचे तिकीटही देण्यात आले होते. पण, दिल्ली एअरपोर्टला पोहोचल्यानंतर मुश्ताक खान यांच्याबरोबर हा प्रकार घडला, अशी माहिती त्यांचे बिजनेस पार्टनर शिवम यादव यांनी दिली आहे. त्यांच्याकडे विमानाचे तिकीट, एअरपोर्टचं सीसीटीव्ही फुटेज, याशिवाय बँक ट्रान्सफरचे डिटेल्सही आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती शिवम यांनी दिली आहे.  

Web Title: stree 2 fame actor mushtaq khan was kidnap demand for 1cr details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.