शाहरुखचा एक सल्ला अन् 'स्त्री २' गाजवणाऱ्या राजकुमार रावचं आयुष्य बदललं! काय म्हणालेला किंग खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:38 PM2024-08-26T12:38:16+5:302024-08-26T12:40:35+5:30

शाहरुख खानने राजकुमार रावला एक खास सल्ला दिला होता.

stree 2 fame rajkumar rao follow advice of shah rukh khan in his life | शाहरुखचा एक सल्ला अन् 'स्त्री २' गाजवणाऱ्या राजकुमार रावचं आयुष्य बदललं! काय म्हणालेला किंग खान?

शाहरुखचा एक सल्ला अन् 'स्त्री २' गाजवणाऱ्या राजकुमार रावचं आयुष्य बदललं! काय म्हणालेला किंग खान?

सध्या 'स्त्री २' सिनेमा चांगलाच गाजतोय. या सिनेमाने अवघ्या ७ दिवसांत ५०० कोटींहून अधिकची कमाई केलीय. 'स्त्री २' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील हा सिनेमा या युनिव्हर्सला आणखी एका वेगळ्या उंचीवर नेण्यास लोकप्रिय झालाय. 'स्त्री २' मध्ये राजकुमार रावने प्रमुख भूमिका साकारलीय. राजकुमार रावने एका मुलाखतीत शाहरुख खानने त्याला आयुष्यात दिलेल्या खास सल्ल्याचं त्याने कसं पालन केलं, याचा किस्सा सांगितलाय. शाहरुखने दिलेला खास सल्ला आपल्या सर्वांसाठीही खूप महत्वाचा आहे.

शाहरुखने राजकुमारला काय सल्ला दिला?

राजकुमार रावने एका मुलाखतीत शाहरुखने त्याला काय  सल्ला दिला होता, याचा उलगडा केला. राजकुमार जेव्हा 'मन्नत'मध्ये शाहरुखला भेटायला गेला होता तेव्हा किंग खान म्हणाला होता की, "जेव्हा स्वतःसाठी घर खरेदी करशील तेव्हा आपल्या लायकीपेक्षा, आपल्या पात्रतेपेक्षा वरचढ घर घ्यायचं असतं. परमेश्वर सर्व बघत असतो. त्यामुळे तो आपल्याला मदत करतोच. जेव्हा तुम्ही महागातलं घर घ्याल तेव्हा तुम्ही ते घर सांभाळायला आणखी मेहनत कराल. हीच मेहनत तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाईल"

राजकुमारने पाळला शाहरुखचा सल्ला

 शाहरुखचे हे शब्द राजकुमारने त्याच्या आयुष्यात केवळ लक्षात नाही ठेवले तर फॉलोही केले. पुढे राजकुमारने जुहूमध्ये तब्बल ४४ कोटींचं घर खरेदी केलं. हे घर सांभाळण्यासाठी आता राजकुमार खूप मेहनत घेताना दिसतोय. राजकुमार त्याची पत्नी आणि अभिनेत्री पत्रलेखासोबत राहत आहे. राजकुमारचा नुकताच रिलीज झालेला 'स्त्री २' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. राजकुमार आगामी 'पुश्तेनी', 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' अशा सिनेमांमध्ये दिसणार आहे. 

Web Title: stree 2 fame rajkumar rao follow advice of shah rukh khan in his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.