'सरकटे का आतंक..'; खळखळून हसवून काळजात धडकी भरवणारा 'स्त्री २' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:38 IST2024-07-18T14:38:22+5:302024-07-18T14:38:57+5:30
बहुचर्चित 'स्त्री २' चा धमाल ट्रेलर रिलीज झालाय. यंदा प्रेक्षकांना सिनेमात विविध सरप्राईज बघायला मिळणार यात शंका नाही (stree 2)

'सरकटे का आतंक..'; खळखळून हसवून काळजात धडकी भरवणारा 'स्त्री २' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
गेल्या अनेक दिवसांपासून 'स्त्री २' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता 'स्त्री २' मध्ये काय दिसणार याची खूप चर्चा आहे. अशातच 'स्त्री २' सिनेमाचा शानदार ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. मुंबईत सर्व प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. 'स्त्री २' चा ट्रेलर आपल्याला खळखळून हसवतोच शिवाय अंगावर काटाही आणतो.
'स्त्री २'चा ट्रेलर
'स्त्री २' च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, चंदेरी गावात ज्या स्त्रीने सर्वांना घाबरवून सोडलेलं ती स्त्री आता नाहीय. परंतु आधी लिहिल्याप्रमाणे स्त्री गेल्यावर गावात सरकटेची दहशत निर्माण होणार आहे. तसंच झालेलं दिसतं. सरकटे गावातील स्त्रियांना पळवून घेऊन जातो. त्यामुळे गावातील महिलांना वाचवण्यासाठी पुन्हा एकदा विकी आणि त्याच्या मित्रांची गँग गावाचं रक्षण करायला सज्ज होते. त्यांच्या साथीला श्रद्धा कपूरही असते. शेवटी सरकटेपासून गावाला वाचवण्यासाठी स्त्रीला पुन्हा बोलावलं जातं. अशाप्रकारे खळखळून हसवून अंगावर काटा आणणारा 'स्त्री २'चा ट्रेलर सर्वांचं लक्ष वेधतो.
'स्त्री २' कधी रिलीज होणार
'स्त्री २' निमित्ताने भयपटांचं एक वेगळं युनिव्हर्स तयार होतंय. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या' या सिनेमांनंतर 'स्त्री २' या युनिव्हर्सला पुढे घेऊन जाणार आहे. या सिनेमात राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहेत. असंही सांगण्यात येतंय की अक्षय कुमार या सिनेमात कॅमिओ करणार आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे हे सिनेमा आल्यावरच कळेल. 'स्त्री २' सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.