Stree 2 : छप्परफाड कमाईतून 'स्त्री २' सिनेमाचा नवा विक्रम, मोडला हा ७ वर्षांचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:14 PM2024-09-02T18:14:55+5:302024-09-02T18:15:54+5:30

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव(Rajkumar Rao)चा 'स्त्री २' (Stree 2) हा चित्रपट आपल्या दमदार कमाईने दर आठवड्याला एक नवा टप्पा गाठत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

Stree 2: New record of 'Stree 2' movie breaking the record of 7 years | Stree 2 : छप्परफाड कमाईतून 'स्त्री २' सिनेमाचा नवा विक्रम, मोडला हा ७ वर्षांचा रेकॉर्ड

Stree 2 : छप्परफाड कमाईतून 'स्त्री २' सिनेमाचा नवा विक्रम, मोडला हा ७ वर्षांचा रेकॉर्ड

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव(Rajkumar Rao)चा 'स्त्री २' (Stree 2) हा चित्रपट आपल्या दमदार कमाईने दर आठवड्याला एक नवा टप्पा गाठत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. देशांतर्गत कलेक्शनसोबतच हा सिनेमा जगभरातील कलेक्शनमध्येही झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाने एक नवा टप्पा गाठला आहे.

मॅडॉक फिल्म्स निर्मित 'स्त्री २' या चित्रपटात केवळ श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या अभिनयानेच लोकांची मने जिंकली नाहीत तर तमन्ना भाटियाचे गाणे देखील चर्चेत राहण्याचे कारण आहे. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाने देशभरात आणि जगभरात ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'स्त्री २'ने या चित्रपटाचा मोडला रेकॉर्ड 
स्त्री २ या चित्रपटाने पहिल्या भागाचा म्हणजेच 'स्त्री'चा विक्रमही मोडला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने यापूर्वीच 'वॉर', 'एक था टायगर', 'धूम ३' सारख्या अनेक चित्रपटांना मागे टाकले होते आणि आता सात वर्षांपासून ५०० कोटींच्या क्लबवर राज्य करणाऱ्या 'बाहुबली'ला मागे टाकले आहे.  बाहुबली २ चाही विक्रम मोडला आहे. 


निर्मात्यांनी चित्रपटाचा डेटा शेअर केला आहे. स्त्री २ चित्रपटाने जगभरात ५९३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. १८व्या दिवशी चित्रपटाच्या खात्यात ४८.७ कोटी रुपये जमा झाले आहेत. या संदर्भात, चित्रपटाने बाहुबली २ला या बाबतीत मागे टाकले आहे, जो तिसऱ्या वीकेंडमध्ये ५०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. खरेतर, 'बाहुबली २' चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडला ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. इतक्या कालावधीत त्या चित्रपटाच्या कलेक्शनचा सात वर्षांचा विक्रम ‘स्त्री २’ या चित्रपटाने मोडीत काढला आहे.

Web Title: Stree 2: New record of 'Stree 2' movie breaking the record of 7 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.