'स्त्री-२'साठी कोणी किती घेतलं मानधन ? श्रद्धा कपूरपेक्षा 'या' अभिनेत्याला मिळाले जास्त पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:49 AM2024-08-23T11:49:43+5:302024-08-23T12:04:23+5:30

सध्या सोशल मीडियावर 'स्त्री २ सिनेमासाठी अभिनेत्यांनी घेतलेल्या मानधनाची चर्चा सुरू आहे. 

Stree 2movie shraddha kapoor charged 5 Crore find out how many Crores Rajkummar Rao, Pankaj Tripathi and other members of the cast got paid | 'स्त्री-२'साठी कोणी किती घेतलं मानधन ? श्रद्धा कपूरपेक्षा 'या' अभिनेत्याला मिळाले जास्त पैसे!

'स्त्री-२'साठी कोणी किती घेतलं मानधन ? श्रद्धा कपूरपेक्षा 'या' अभिनेत्याला मिळाले जास्त पैसे!

Stree 2 : श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) व राजकुमार राव ( Rajkummar Rao) यांचा बहुचर्चित चित्रपट 'स्त्री २' हा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'स्त्री' २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी "स्त्री २' प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आला आणि बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला. श्रद्धा कपूर ,  राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने जगभरात तब्बल ४२८ कोटी रुपये कमावले आहेत.  या सिनेमासाठी अभिनेत्यांनी मोठी रक्कम घेतली आहे. सध्या सोशल मीडियावर 'स्त्री २ सिनेमासाठी अभिनेत्यांनी घेतलेल्या मानधनाची चर्चा सुरू आहे. 

जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार,  'स्त्री २'चे बजेट ५० कोटी रुपये आहे. या चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी ३ कोटी रुपये घेतले आहेत. तर अपारशक्ती खुरानाने ७० लाख आणि अभिषेक बॅनर्जीने ५५ लाख रुपयांचं मानधन घेतलंय. तर अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं ५ कोटी रुपये घेतले आहेत. श्रद्धा कपूरपेक्षा जास्त मानधन हे राजकुमार रावने घेतलं आहे. सिनेमासाठी त्याने तब्बल ६ कोटी रुपये घेतले आहेत. एवढंच नाही तर कॅमिओ करणारा अभिनेता वरुण धवननेदेखील २  कोटी रुपये घेतले आहेत.


सध्या बॉक्स ऑफिसवर केवळ स्त्री २ सिनेमाचाच बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे. थोड्याच दिवसांत श्रद्धा कपूरचा सिनेमा हा ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. या सिनेमाने एकूण ४२८ कोटी रुपये कमावले आहेत. तर भारतातील कमाई जवळपास ३०८ कोटींएवढी आहे. तर भारताबाहेर ६४.५ कोटींचा गल्ला जमावला. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या' या सिनेमांनंतर 'स्त्री २' या युनिव्हर्समधील पुढचा सिनेमा आहे. 
 

Web Title: Stree 2movie shraddha kapoor charged 5 Crore find out how many Crores Rajkummar Rao, Pankaj Tripathi and other members of the cast got paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.