वाचा स्ट्रीट डान्सर आणि पंगामध्ये कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 04:07 PM2020-01-27T16:07:34+5:302020-01-27T16:20:06+5:30
स्ट्रीट डान्सर आणि पंगामध्ये बॉक्स ऑफिसवर कोणी बाजी मारली हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
श्रद्धा कपूर आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला स्ट्रीट डान्सर आणि कंगना रणौतचा पंगा एकाच दिवशी प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना समीक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर कोणी बाजी मारली हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. आता बॉक्स ऑफिसवर स्ट्रीट डान्सर सुसाट सुटला असून पंगा या चित्रपटाचे कलेक्शन खूपच कमी झाले आहे.
पंगा या चित्रपटाच्या कथेचे, अश्विनी अय्यरच्या दिग्दर्शनाचे आणि कंगनाच्या अभिनयाचे समीक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमाल करता आली नाही.
विकेंडला स्ट्रीट डान्सर आणि पंगा दोन्ही चित्रपट चांगली कमाई करतील अशी आशा व्यक्त केली जात होती. पण शनिवार, रविवारी असलेल्या सुट्टीचा पंगाला नव्हे तर स्ट्रीट डान्सरला फायदा झाला. या चित्रटाच्या कमाईबाबत तरण आदर्श यांनी ट्वीट करून सांगितले आहे. त्यांनी ट्वीट मध्ये लिहिले आहे की, स्ट्रीट डान्सरने विकेंटला खूपच चांगला व्यवसाय केला. शुक्रवारी 10.26 कोटी, शनिवारी 13.21 कोटी आणि रविवारी 17.76 कोटी इतका व्यवसाय करत या चित्रपटाने आतापर्यंत 41.23 करोड रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले आहेत.
#StreetDancer3D puts up a healthy total in its weekend... Saw an upswing on Day 3, aided by #RepublicDay holiday... Strong in mass belt... Needs to maintain the pace on weekdays... Fri 10.26 cr, Sat 13.21 cr, Sun 17.76 cr. Total: ₹ 41.23 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 27, 2020
तसेच त्यांनी पंगाच्या कलेक्शनविषयी देखील ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, पंगा बॉक्स ऑफिसवर खूप चांगला व्यवसाय करेल अशी आशा होती. या चित्रपटाबाबत लोकांकडून देखील चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. या चित्रपटाने शुक्रवारी 2.70 कोटी, शनिवारी 5.61 कोटी, रविवारी 6.60 कोटी इतकी कमाई करत 14.91 इतके कलेक्शन केले.
#Panga fares below expectations, despite glowing word of mouth... Biz escalated on Day 2, but the jump was missing on Day 3 [#RepublicDay]... Needs to trend very strongly on weekdays for a firm footing... Fri 2.70 cr, Sat 5.61 cr, Sun 6.60 cr. Total: ₹ 14.91 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 27, 2020
स्ट्रीट डान्सर आणि पंगाचे कलेक्शन पाहाता स्ट्रीट डान्सर बॉक्स ऑफिसवर सरस ठरला आहे. 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना देखील स्ट्रीट डान्सरने चांगली कमाई केले असल्याने या चित्रपटाच्या टीमचे सगळ्यांकडून कौतुक होत आहे.