'कंगना राणौत Go Back', 'धाकड'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या विरोधात जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 10:51 AM2021-01-13T10:51:41+5:302021-01-13T10:52:12+5:30

कंगना राणौत भोपाळमध्ये आगामी चित्रपट धाकट चित्रपटाचे शूटिंग करते आहे. शूटिंग दरम्यान तिला एका आंदोलनाचा सामना करावा लागला आहे.

Strong protests against the actress during the shooting of 'Kangana Ranaut Go Back', 'Dhakad' | 'कंगना राणौत Go Back', 'धाकड'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या विरोधात जोरदार निदर्शने

'कंगना राणौत Go Back', 'धाकड'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या विरोधात जोरदार निदर्शने

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येते. बऱ्याचदा ती वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येते तर कधी तिच्यावर होणाऱ्या टीकेमुळे ती चर्चेत येते. सध्या ती भोपाळमध्ये आगामी चित्रपट धाकट चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला आहे. 


मीडिया रिपोटनुसार कंगनाच्या भोपाळमधील शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या. त्याची मागणी आहे की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करते आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन शूट करत आहे. 


कंगना राणौतने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करते आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट टॅक्स फ्री होण्याची शक्यता आहे.


कंगनाने नुकतेच ए.एल. विजय दिग्दर्शित थलायवी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलावली चित्रपट मागील वर्षी २६ जूनला प्रदर्शित होणार होता. पण, कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Strong protests against the actress during the shooting of 'Kangana Ranaut Go Back', 'Dhakad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.