करण जोहरला का आठवण आली कॉलेजच्या दिवसांची?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:04 PM2019-04-10T12:04:45+5:302019-04-10T12:05:57+5:30
स्टुडंट ऑफ द इयर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाद्वारे करण जोहर काही नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे.
स्टुंडट ऑफ द इयर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाद्वारे करण जोहरने आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांना लाँच केले होते. या पहिल्याच चित्रपटाने या सगळ्यांना स्टार बनवले. आलिया आणि वरुण यांनी तर आज बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडला इतके स्टार दिल्यानंतर आता तो या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
स्टुडंट ऑफ द इयर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाद्वारे करण जोहर काही नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबतच या चित्रपटात तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. या चित्रपटाचे पहिले सेशन 10 एप्रिलला सुरू होणार असल्याची माहिती करण जोहरने नुकतीच ट्वीट द्वारे सगळ्यांना सांगितली आहे. करण जोहरने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी कॉलेजच्या आयुष्यात सात वर्षांनी परतत आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत कॉलेजच्या आठवणींमध्ये रममाण व्हा...
Going back to the 'college feels' after 7 years! Stay tuned and watch this space! @iTIGERSHROFF#Tara#Ananya@punitdmalhotra@apoorvamehta18@DharmaMovies@foxstarhindi@SOTYOfficialpic.twitter.com/uqoTaaRTky
— Karan Johar (@karanjohar) April 9, 2019
करण प्रमाणेच या चित्रपटातील टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया या कलाकारांनी देखील या चित्रपटाचे पहिले सेशन सुरू होणार असल्याची ट्वीटरद्वारे माहिती दिली आहे. स्टुडंट ऑफ द इयर २ हा चित्रपट 10 मे 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही आठवडे आधी एक सरप्राईज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर चित्रीकरणाच्या पहिला दिवसाचा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, एकमेकांची ओळख होऊन आता एक वर्षं झाले आहे. प्रत्येक दिवस आमच्यासाठी खास होता. आता केवळ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी एक महिना शिल्लक राहिला आहे.
स्टुडंट ऑफ द इयर २ चे नवे पोस्टर, टीझर अथवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.
Are you ready to take the challenge? #SOTY2@iTIGERSHROFF#Tara#Ananya@punitdmalhotra@apoorvamehta18@DharmaMovies@foxstarhindi@ZeeMusicCompany@SOTYOfficialpic.twitter.com/KnJ7Th09cp
— Karan Johar (@karanjohar) April 10, 2019