Stunning Look...! सनी लियोनीचा स्वस्त आऊटफिट; तरीदेखील आपल्या ग्लॅमरस लूकनं पाडली भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 18:56 IST2019-05-15T18:54:36+5:302019-05-15T18:56:02+5:30
सनी लियोनीने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात ती व्हाईट क्रॉप टॉप व यल्लो रंगाच्या डेनिम स्कर्टमध्ये पहायला मिळते आहे.

Stunning Look...! सनी लियोनीचा स्वस्त आऊटफिट; तरीदेखील आपल्या ग्लॅमरस लूकनं पाडली भुरळ
बॉलिवूडचे सेलिब्रेटीज आपल्या अभिनय व सिनेमाव्यतिरिक्त फॅशन सेन्स, ब्रॅण्डेड व महागड्या कपडे आणि वस्तूंसाठी ओळखले जातात. सेलिब्रेटीज पार्टीसोबतच एअरपोर्ट असेल किंवा जिममध्येदेखील महागड्या कपड्यात पहायला मिळतात. मात्र अभिनेत्री सनी लियोनी नुकतीच स्वस्त कपड्यात पहायला मिळाली.
सनी लियोनीने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात ती व्हाईट क्रॉप टॉप व यल्लो रंगाच्या डेनिम स्कर्टमध्ये पहायला मिळते आहे. यासोबत तिने पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या लूकमध्ये सनी खूप ग्लॅमरस व सुंदर दिसते आहे. या फोटोत सनीने परिधान केलेला ड्रेस खूप स्वस्त आहे. जर सनी सारखा गेटअप करायचा असेल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
सनी लियोनीचा हा ड्रेस फक्त २२०० रुपयांचा आहे.
तिने परिधान केलेला क्रॉप टॉप ८९९ रुपयांचा आहे आणि स्कर्टची किंमत आहे १२९९. याचा अर्थ सनीसारखा ड्रेस विकत घ्यायचा असेल तर फक्त २१९८ रुपये खर्च करावे लागतील.
हा ड्रेस सनीने एमटिव्ही स्प्लिट्सव्हिला सीझन १२च्या तयारीवेळी घातला होता. हा फोटो राजस्थानमधील जयपूर इथला आहे.
सनी ही पहिली अभिनेत्री नाही जिने स्वस्त ड्रेस परिधान केला आहे. यापूर्वी सारा अली खान व करीना कपूर खान यादेखील स्वस्त ड्रेसमध्ये स्पॉट झाल्या आहेत.
सनीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी तिला बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटीजने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या कामाबद्दल सांगायचे तर सनी शेवटची तमीळ चित्रपट वीरमादेवीमध्ये दिसली होती.