‘सौदागर’च्या शूटिंगदरम्यान सुभाष घईने मनीषा कोईरालाचे केले होते लैंगिक शोषण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 12:48 PM2017-09-20T12:48:30+5:302017-09-20T18:33:02+5:30

बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘सौदागर’ तुम्हाला आठवत असेलच. हा चित्रपट रिलीजदरम्यान त्यातील स्टारकास्टमुळे चांगलाच चर्चेत राहिला. कारण या चित्रपटातील अभिनेत्री ...

Subhash Ghai had done Manisha Koirala during the shooting of 'Saudagar' | ‘सौदागर’च्या शूटिंगदरम्यान सुभाष घईने मनीषा कोईरालाचे केले होते लैंगिक शोषण?

‘सौदागर’च्या शूटिंगदरम्यान सुभाष घईने मनीषा कोईरालाचे केले होते लैंगिक शोषण?

googlenewsNext
लिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘सौदागर’ तुम्हाला आठवत असेलच. हा चित्रपट रिलीजदरम्यान त्यातील स्टारकास्टमुळे चांगलाच चर्चेत राहिला. कारण या चित्रपटातील अभिनेत्री मनीषा कोईरालाने त्यावेळी चक्क दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. त्यामुळे या चित्रपटापेक्षा मनीषाच्याच आरोपावर अधिक चर्चा रंगू लागली. वास्तविक दिग्दर्शक सुभाष घई यांचे नेहमीच त्यांनी लॉन्च केलेल्या अभिनेत्रीबरोबर नाव जोडले गेले आहे. मग ती महिमा चौधरी असो वा माधुरी दीक्षित यांनीही सुभाष घईवर अशाप्रकारचे आरोप केले आहेत. मात्र सुभाष घई यांनी नेहमीच अशाप्रकारचे आरोप फेटाळून लावत प्रकरण दडपणाचा प्रयत्न केला आहे. 

१९९१ मध्ये जेव्हा मनीषा कोईराला ‘सौदागर’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती, तेव्हा मनीषाने सुभाष घर्इंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मात्र सुभाष घई यांनी नेहमीप्रमाणे पलटवार करीत मनीषालाच दोषी ठरविले. सुभाष घईने म्हटले होते की, मनीषाचे टीमबरोबर चांगले वर्तन नव्हते. ज्याकरिता मी तिला बºयाचदा हटकलेही होते. वास्तविक, मनीषाने सुभाष घर्इंवरील या आरोपाचा उल्लेख माध्यमांसमोर केला नव्हता. तर तिच्या आईने याविषयीचा खुलासा केला होता. 



काही रिपोर्टमध्ये तर असाही दावा करण्यात आला होता की, मनीषाच्या आईने तिच्या पब्लिसिटीसाठी हा सर्व प्रकार केला होता. रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, मनीषाचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे तिच्या आईला असे वाटत होते की, मनीषा नेहमीच चर्चेत राहावी. त्यामुळे त्याकाळी सुभाष घईवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कितपत सत्यता होती, हे मनीषाच सांगू शकते. 

मनीषाच्या या आरोपामुळे संतापलेले सुभाष घई तिची चित्रपटातून हकालपट्टी करू इच्छित होते. मात्र मनीषा नेपाळमधील एका राजकीय घराण्याशी संबंधित असल्यामुळे त्यांनी तसे केले नाही. कालांतराने हे प्रकरण दडपले गेले. असो, हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा ब्लाकबस्टर ठरला. त्यानंतर सुभाष घई यांनी पुन्हा कधीही मनीषाबरोबर चित्रपट केला नाही. अजूनही त्यांच्यातील वैर कायम असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Subhash Ghai had done Manisha Koirala during the shooting of 'Saudagar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.