सुभाष घईंना प्रियंका चोप्राला या सिनेमात करायचं होतं कास्ट, पण बेबोची झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:30 IST2024-12-24T13:29:48+5:302024-12-24T13:30:43+5:30

Subhash Ghai, Priyanka Chopra And Kareena Kapoor : महिमा चौधरीपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींचे करिअर घडवण्यासाठी सुभाष घई ओळखले जातात. २००१ साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटात त्यांना त्याच वर्षी मिस वर्ल्ड बनलेल्या प्रियंका चोप्राला कास्ट करायचे होते परंतु ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांना करीना कपूरला घ्यावे लागले.

Subhash Ghai wanted to cast Priyanka Chopra in this film, but Bebo Aka Kareena Kapoor entered instead. | सुभाष घईंना प्रियंका चोप्राला या सिनेमात करायचं होतं कास्ट, पण बेबोची झाली एन्ट्री

सुभाष घईंना प्रियंका चोप्राला या सिनेमात करायचं होतं कास्ट, पण बेबोची झाली एन्ट्री

९० आणि २०००च्या दशकात असे अनेक चित्रपट आले, ज्यांना त्यावेळी फारसा रिस्पॉन्स मिळाला नसेल. पण आज त्या सिनेमांना खूप प्रेम मिळते आहे. शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा डुप्लिकेटपासून, मुझसे दोस्ती करोगी, लक्ष्य, रुद्राक्ष असे अनेक चित्रपट आहेत, जे त्यावेळी चित्रपटगृहात फ्लॉप झाले होते. या यादीत हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांचाही एक चित्रपट आहे. हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता, जो त्या वर्षातील सर्वात मोठा फ्लॉप ठरला होता. बड्या अभिनेत्रींची कारकीर्द घडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुभाष घई यांनाही त्यांच्या चित्रपटासाठी पूर्णपणे फ्रेश चेहरा हवा होता. त्यांना २००० मध्ये मिस वर्ल्ड बनलेल्या प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)ला हृतिक रोशन(Hritik Roshan)सोबत या चित्रपटात कास्ट करायचे होते, परंतु काही कारणास्तव त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. अनेक अभिनेत्रींनी नाकारल्यानंतर करीना कपूर(Kareena Kapoor)ला हा चित्रपट मिळाला. 

१९९७ साली शाहरुख खान आणि महिमा चौधरी अभिनीत 'परदेस' चित्रपटासह संगीतमय चित्रपट बनवण्याचा प्रवास सुरू करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते सुभाष घई यांनी २००१ मध्ये 'यादें' नावाचा चित्रपट बनवला होता. करीना कपूर खानने या चित्रपटात जॅकी श्रॉफची मुलगी ईशा पुरीची भूमिका साकारली होती, ज्यात सिंगल वडील आणि त्यांच्या तीन मुलींची कथा आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ट्रिविया स्टोरीत असे सांगण्यात आले आहे की, सुभाष घई यांच्या 'यादें' या चित्रपटासाठी करीना कपूर खान ही पहिली पसंती नव्हती. २००० मध्ये जेव्हा प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड बनली तेव्हा सुभाष घई यांना त्यांच्या चित्रपटात हृतिक रोशनच्या विरुद्ध प्रियंकाला कास्ट करायचे होते. मात्र, कराराच्या बंधनांमुळे प्रियंका चोप्राने या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला.

अमिषा पटेललाही सिनेमाची दिलेली ऑफर, पण...

प्रियंका चोप्राने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर चित्रपट थेट करीना कपूरकडे गेला असे जर तुम्ही विचार करत असाल तर तसे अजिबात नाही. जेव्हा देसी गर्लने या सिनेमात काम करण्याची ऑफर नाकारली तेव्हा सुभाष घई यांनी हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है'ची को-स्टार अमिषा पटेलला विचारले. हृतिक रोशन आणि अमिषाच्या जोडीने त्यांच्या पदार्पणातच आश्चर्यकारक कामगिरी केली होती, त्यामुळे दिग्दर्शकाला पूर्ण आशा होती की अमिषाने होकार दिल्यास सर्व काही चांगले होईल. मात्र, त्यावेळी अमिषा पटेलही हा चित्रपट करण्यासाठी उपलब्ध नव्हती. 

मग करीना कपूरची झाली एन्ट्री

अमिषाचीही वर्णी न लागल्यानंतर, जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट करीना कपूरला वाचून दाखवली तेव्हा तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिला. मात्र, त्यावेळी करीनाचे चित्रपट फारसे चालत नव्हते. तिचा पहिला चित्रपट 'रिफ्युजी'नंतर तिचा दुसरा चित्रपट 'मुझे कुछ कहना है' हादेखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यानंतर, २००१ मध्ये त्यांचा 'यादें' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Web Title: Subhash Ghai wanted to cast Priyanka Chopra in this film, but Bebo Aka Kareena Kapoor entered instead.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.