स्वतःच्या प्रतिभेने यशस्वी झाले 'हे' स्टार्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 09:21 AM2017-11-26T09:21:10+5:302017-11-26T14:51:10+5:30
-रवींद्र मोरे कंगणा राणावतने करण जोहरला घराणेशाही चालवत असल्याचा आरोप करुन नव्या वादाला सुरुवात केली होती. शिवाय काही दिवसांपूर्वी, ...
कंगणा राणावतने करण जोहरला घराणेशाही चालवत असल्याचा आरोप करुन नव्या वादाला सुरुवात केली होती. शिवाय काही दिवसांपूर्वी, राजकारणात घराणेशाही असते तशीच बॉलिवूडमध्येदेखील आहे असे उद्गार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना काढले होते. यासाठी बिग बींचा चिरंजीव अभिषेकला हा अभिनयाचा वारसा मिळाल्याचेही गांधी म्हणाले होते. असे असले तरी अनेक कलाकार आपल्या प्रतिभेच्या जोरावर कोणाचीही शिफारस नसताना बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवून ठाम उभे आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...
* शाहरुख खान
शाहरुख खानला कसलेही पैशाचे पाठबळ आणि अभिनयाचा वारसाही नव्हता. आता मात्र स्वत:च्या मेहनतीने हा अभिनेता खूप स्ट्रगल करुन स्वत:च्या हिंमतीवर बॉलिवूडला नाचवतोय. प्रचंड आत्मविश्वास, चतुरस्त्र अभिनयशैली आणि प्रतिभेच्या जोरावर तो खऱ्या अर्थाने आज बॉलिवूडचा किंग खान आहे.
* अक्षय कुमार
सुरुवातीला हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम तसेच मॉडेलिंग आणि अभिनय करीत अक्षयकुमार आता सुपरस्टार या पदावर पोहोचलाय. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अक्षय कुमारचा बॉलिवूड प्रवास विस्मयकारक आहे. मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेतलेला अभिनेता तो आज जो काही आहे ते चाहत्यांच्या प्रेमामुळे असल्याचे अनेक मुलाखतीत त्याने सांगितलंय. तो अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे करीत असतो.
* दीपिका पादुकोण
बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची ही मुलगी दीपिका पदुकोण. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत ती बॅडमिंटनपटू बनली. पण मॉडेलिंगच्या क्षेत्रात करियर करण्याचा तिने निर्णय घेतला, पण हे ग्लॅमरचे जग स्थिर होण्यासाठी तिला कठिण वाटू लागले. अनेक ठिकाणी तिला नकार ऐकायला मिळाला. अखेर तिच्यातील प्रतिभा फराह खानने ओळखली आणि पुढील इतिहास रचला गेला.
* प्रियांका चोप्रा
२००० मध्ये मिस वर्ल्ड बनलेल्या प्रियांकासाठी चंदेरी दुनियेत पाऊल टाकणे सोपे नव्हते. छोट्या बरेलीपासून बॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास अनेक अडथळ्यांचा होता. अनेक चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आले. नकार ऐकायची सवय झालेल्या प्रियांकाने आपला जलवा दाखवून देत आता आपली किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आहे.
*कंगना रानावत
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली कंगना रानावत अनेक वादग्रस्त विधानांच्यामुळे चर्चेत असते. छोट्या शहरातून मुंबई मायानगरीत नशीब आजमावण्यासाठी आलेल्या कंगनाने टोकाचा संघर्ष केलाय. लैंगिक छळाचा सामना करीत न हारता तिने आपला अभिनयाच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला. आता ती बॉलिवूडची क्विन म्हणून ओळखली जाते.
*नवाजुद्दीन सिद्दीकी
उत्तर प्रदेशातील छोट्या गावतून आलेला हा गरीब अभिनेता बॉलिवूडमध्ये मिळेल ते काम करीत होता. अभिनेताच व्हायचे हे ठाम ठरवून आलेल्या नवाजचा प्रवास अंगावर रोमांच उभे करणारा आहे. संघर्षाच्या काळात नकार ऐकणे, दुय्यम वागणूक मिळणे, पैशांची चणचण अशा अनेक समस्यांशी मुकाबला त्याने केलाय. अनुराग कश्यपने त्याला ‘फैजल’ बनवले आणि बॉलिवूडला हा ‘नवाज’ मिळाला.