फवाद व माहिरावर अशीही ‘बंदी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2016 11:42 AM2016-10-24T11:42:10+5:302016-10-24T12:20:02+5:30
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना देशात बंदी घालण्याची मागणी झाली आणि याचा सर्वाधिक फटका करण जोहरच्या ‘ऐ दिल है ...
उ ी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना देशात बंदी घालण्याची मागणी झाली आणि याचा सर्वाधिक फटका करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटास बसला. मनसेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळून ‘ए दिल...’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला खरा पण पाकी कलावंताना होत असलेल्या विरोधाची धार अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे पाकी कलाकारांना बॉलिवूड फिल्म मेकर्सला तंबी द्यावी लागलीयं. होय,‘ऐ दिल’आणि ‘रईस’च्या मेकर्सने पाकी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांना तूर्तास तोंड बंद ठेवण्यास बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनाही मीडियाशी बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. कुठल्याही पत्रकारास मुलाखत द्यायची नाही. मीडियासमोर तोंड उघडायचे नाही, असे त्यांना स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे.
‘ऐ दिल’मध्ये फवाद खान तर ‘रईस’मध्ये माहिरा खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पाकी कलाकारांना बंदी घालण्याच्या मुद्यावरून रान पेटले असल्यामुळे मेकर्स कुठलाही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाहीत. चित्रपटाच्या रिलीजवर या मुद्याचा परिणाम होऊ नये, यासाठी मेकर्सचे प्रयत्न सुरु आहेत. याचमुळे पाकी कलाकारांना मीडियाशी बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता माहिरा व फवाद या बंदीचे किती पालन करतात, ते दिसेलच.
भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात काम देणार नाही, या अटीवर ‘ऐ दिल...’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ही अट बघता, तसेही फवाद, माहिरा यांचे बॉलिवूडमधील हे शेवटचे चित्रपट ठरणार आहेत.